agriculture news in Marathi horticulture crop insurance agreements cancels Maharashtra | Page 3 ||| Agrowon

पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे करार रद्द 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 जून 2021

राज्यातील फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीकविम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे (ट्रिगर) निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांना लाभाचा बेभरवसा निर्माण झाला होता.

सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीकविम्याच्या लाभासाठी ठरवलेल्या प्रमाणकांचे (ट्रिगर) निकष चुकीच्या पद्धतीने ठरवल्याने शेतकऱ्यांना लाभाचा बेभरवसा निर्माण झाला होता. साहजिकच, या योजनेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होता. शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधानंतरही कृषी विभागाने गतवर्षी ही योजना तशीच सुरू ठेवली. पण शेतकऱ्यांनी त्याला हवा तसा प्रतिसाद दिला नाही. अखेरीस तब्बल वर्षभरानंतर कृषी विभागाला जाग आली असून, या योजनेसाठी कंपन्यांशी केलेला करार रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. 

कृषी आयुक्तालयाच्या मुख्य सांख्यिकी विभागाने यासंबंधीचे पत्र राज्यातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पाठवले असून, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचा करार रद्द करण्यात आल्याचे त्यात म्हटले आहे. तसेच मृग आणि आंबिया बहरांसाठी सन २०२१-२२ ते २०२३-२४ या कालावधी करता नव्याने ई-निविदा मागवल्या आहेत. लवकरच यासंदर्भात नवीन शासन निर्णय जाहीर होईल. त्यानंतरच पीकविमा संकेतस्थळ खुले करण्यात येईल, असेही म्हटले आहे. 

दरम्यान, ‘अॅग्रोवन’नेही गेल्या वर्षी (११ जून २०२० च्या अंकात) यासंबंधी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करत ही योजना शेतकऱ्यांच्या दृष्टीने कशी गैरसोयीची आहे, हे मांडले होते. त्याशिवाय डाळिंब, द्राक्ष आधी फलोत्पादक संघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनीही स्वतंत्ररीत्या पत्र पाठवून यात दुरुस्तीची मागणी केली होती. पण त्यावर कोणताच निर्णय झाला नव्हता. विशेषतः डाळिंब उत्पादकांना त्याची सर्वाधिक झळ बसणार होती.

या योजनेनुसार डाळिंबासह सर्वच फळपिकांसाठी त्या त्या फळानुसार स्वतंत्र ट्रिगर ठरवण्यात आले होते. विशेष म्हणजे हे ट्रिगर गतवर्षी केवळ एका वर्षासाठी ठरवले नव्हते. तर पुढील तीन वर्षांसाठी होते. या विमा योजनेनुसार जुलै ते ऑगस्ट या कालावधीत सलग पाच दिवस २५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला, तरच मृग बहरातील नुकसान भरपाई मिळणार होती. पूर्वी हा निकष दोन दिवसांपर्यंत होता. त्यामुळे सलगपणे असा पाऊस पडेल का आणि नुकसानभरपाई मिळेल का, याबाबत साशंकता निर्माण झाली होती. 

ट्रीगरचे जाचक निकष 
वास्तविक, डाळिंबासह अन्य काही फळे कमी पर्जन्यमान असलेल्या सोलापूरसह जळगाव, बुलडाणा, वाशीम, जालना यांसारख्या जिल्ह्यात घेतली जातात. या भागातील बहुतांश भाग हा कोरडवाहू आणि कमी पर्जन्यमानाचा आहे, असे असतानाही पावसाचा खंड या आधारावर निकष ठरवायला हवेत, पण पडणाऱ्या अधिकच्या पावसाच्या आधारावर ट्रीगरचे निकष ठरवले गेले, त्यामुळे शेतकऱ्यांचा त्याला विरोध वाढला. 

प्रतिक्रिया
पीकविमा योजना सोपी आणि सुटसुटीत व्हायला हवी. पण सरकारच त्यात पैसे मिळविण्यासाठी असा गोंधळ घालते, असो शेतकऱ्यांच्या विरोधानंतर उशिरा का होईना, कृषी विभागाला जाग आली, हे महत्त्वाचं. 
- विजय रणदिवे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी युवा आघाडी, सोलापूर 

कृषी विभागाचे यासंबंधीचे पत्र आम्हाला मिळाले आहे. फळपीक विम्याबाबत लवकरच शासनाचे नवे आदेश येतील. तेव्हा त्यानुसार पीकविमा भरण्याबाबत शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी. 
- रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर 


इतर अॅग्रो विशेष
पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी यापुढे...कोल्हापूर : सातत्याने निर्माण होणाऱ्या पूर...
दोष पीकविमा कंपन्यांचा, रोष आमच्यावर;...पुणे ः पीकविमा योजनेचे कंत्राट मिळवलेल्या खासगी...
दिवेकर, ताटेंसह १४ कृषी उपसंचालकांच्या...पुणे ः राज्याच्या कृषी आयुक्तालयातील ठिबक कक्षाचे...
मध्य महाराष्ट्र, कोकण, घाटमाथ्यावर हलका...पुणे : राज्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी...
पीकविमा तक्रार निवारण व्यवस्थेचे तीन...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेबाबत समस्या किंवा...
यवतमाळ जिल्ह्यात वाघांची संख्या वीस यवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात...
बावीस जिल्ह्यांत उभारणार तेलघाणे नागपूर ः विदर्भात तेलबियावर्गीय पिकांना...
सोयाबीन पिकाची किडीकडून चाळणआर्णी, जि. यवतमाळ : तालुक्यातील लोणी येथील...
‘आयटी’ मित्रांची शेती व्यवस्थापन कंपनीतुमची शेती आमच्यावर सोपवा, आम्ही आधुनिक...
लवांडे यांनी उभारली चारा पिकांची...फत्तेपूर (जि.. नगर) येथील अल्पभूधारक सोमेश्वर...
‘एफपीओं’ना बनवा अधिक कार्यक्षमशेतीसाठीच्या सध्याच्या अत्यंत प्रतिकूल अशा...
विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रामुळे...
नुकसानीच्या दोन लाखांहून अधिक सूचना...पुणे ः राज्यभर कृषी विभागाच्या कार्यालयांमध्ये...
विमा कंपन्यांच्या नफेखोरीला सरकारी...पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेचा कारभार गेल्या...
राज्यात हलका, मध्यम पावसाची हजेरी पुणे : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने...
महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणा...मुंबई : महाराष्ट्र सेंद्रिय प्रमाणीकरण यंत्रणेची...
केबल शेडनेटला आता अनुदान पुणे ः राज्याच्या संरक्षित शेतीला चालना...
शेळीपालनापाठोपाठ घरालाही दिले ‘ॲग्रोवन...औरंगाबाद : शेतकऱ्याचं ‘ॲग्रोवन’वरचं प्रेम पुन्हा...
शेतकरी कंपन्यांसाठी २०० कॉपशॉप साकारणार पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना...
एकोप्याच्या बळावर बदलले वडगाव गुप्ताचे...दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या वडगाव गुप्ता (ता. जि....