परभणी जिल्ह्यात फळबागेची ६३९ हेक्टरवर लागवड

horticulture  planted on 639 hectares in Parbhani district
horticulture planted on 639 hectares in Parbhani district

परभणी : यंदा सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फळबाग लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. जानेवारी अखेरपर्यंत भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गंत ६०२ शेतकऱ्यांनी ५८४.१७ हेक्टरवर, तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत ७१ शेतकऱ्यांनी ५५.४० हेक्टरवर फळबाग लागवड केली. या दोन योजनांमध्ये एकूण ६७३ शेतकऱ्यांनी ६३९.५७ हेक्टरवर ही लागवड केली, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. 

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गंत यंदासाठी ४ कोटी २८ लाख ६२ हजार रुपये निधीची तरतूद आहे. जिल्ह्यातील एकूण १५ हजार २१८ शेतकऱ्यांनी १५ हजार ४७५.२७ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी प्रस्ताव दाखल केले होते. जानेवारी अखेरपर्यंत ७ हजार ३८८ शेतकऱ्यांना ६ हजार ६८९.२६ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. ९६१ शेतकऱ्यांना ९५१.५५ हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मान्यता देऊन प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. ऑक्टोबर महिन्यातील पावसामुळे सिंचन स्त्रोतांना पाणी उपलब्ध झाले. त्यानंतर फळबाग लागवड क्षेत्रात वाढ झाली. 

जानेवारी अखेरपर्यंत ६०२ शेतकऱ्यांनी ५८४.१७ हेक्टरवर फळबाग लागवड केली. या योजनेतंर्गंत एकूण १ कोटी लाख १६ लाख ५३ हजार रुपये एवढा निधी मिळाला. १८९ शेतकऱ्यांना १७१ हेक्टरवरील फळबाग लागवडीसाठी ६० लाख ६९ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवडीतंर्गत  आंब्याची ४३, पेरु ८९, डाळींब ४, मोसंबी २४, संत्रा २३८, लिंबू १०८, सिताफळ ७५, चिंच २,  अंजीर ४, चिकू १४, जांभुळ १, तर रोहयोतंर्गत आंब्याची ८, चिकु ६, पेरु १, संत्रा ३७, मोसंबी २, लिंबू १५, सिताफळाची २ शेतकऱ्यांनी लागवड केली. 

मनरेगाअतंर्गत ५५.४० हेक्टरवर फळबागा 

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत ३१० शेतकऱ्यांनी २५९.८० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २६४ शेतकऱ्यांना २१५.१० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी तांत्रिक मंजुरी देण्यात आली. प्रशासकीय मंजुरी दिलेल्या २१४ पैकी ८० शेतकऱ्यांनी ६०.८० हेक्टरवर फळबाग लागवडीसाठी खड्डे खोदले. त्यापैकी ७१ शेतकऱ्यांनी ५५.४० हेक्टरवर फळबाग लागवड केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com