agriculture news in Marathi horticulture planting target over one lac hactor Maharashtra | Agrowon

एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 मे 2021

कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली तरी फलोत्पादन अभियानावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली तरी फलोत्पादन अभियानावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यंदा एक लाख हेक्टरवर नव्या बागा उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.

कोविड स्थितीला गेल्या दोन वर्षांपासून कृषी खात्याचे कर्मचारी सामोरे जात आहेत. गेल्या हंगामात मार्चपासून साथीचा फैलाव व लॉकडाउनचे संकट उभे राहिले. या स्थितीत देखील ३७ हजार ५०० हेक्टरपर्यंत राज्यात नवी लागवड झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख रुपये अनुदान वाटण्यात आले. यंदा लागवडदेखील मोठी आणि अनुदानवाटप देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत जादा वाटप होण्यासाठी कृषी विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. 

राज्यात यंदा जिल्ह्यानिहाय होणाऱ्या नव्या फळबाग लागवडीचे नियोजन असे: (आकडे हेक्टरमध्ये) ठाणे १६२०, पालघर २७००, रायगड ४१४०, रत्नागिरी ५०४०, सिंधुदुर्ग ५०४०, नाशिक ५०४०, धुळे १९२०, नंदूरबार २२८०, जळगाव २१७०, नगर ५०७०, पुणे ४४४०, सोलापूर ५०४०, सातारा ३८००, सांगली २८१०, कोल्हापूर २९५०, औरंगाबाद ३५८०, जालना २५२०, बीड ३०६०, लातूर २६००, उस्मानाबाद २४२०, नांदेड ३३८०, परभणी २६४०, हिंगोली १३९०, बुलडाणा ३२३०, अकोला २०८०, वाशीम १७२०, अमरावती ४०८०, यवतमाळ ३६१०, वर्धा २०४०, नागपूर २६४०, भंडारा १४४०, गोंदिया १२३०, चंद्रपूर २२४०, गडचिरोली १६००. 

फळबाग लागवडीसाठी शेतकऱ्यांमध्ये जागृती करणे आणि त्यांच्यापर्यंत योजनेची वैशिष्ट्ये पोहोचविण्याची जबाबदारी कृषी सहायकांवर देण्यात आली आहे. कोकण विभागातील ११२८ कृषी सहायकांना प्रत्येकी १५ हेक्टरपर्यंत नवी लागवड होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आले आहे. राज्याच्या इतर भागांतील ८३०२ सहायकांना प्रत्येकी १० हेक्टरवर लागवड करण्याबाबत कामे करावी लागतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. 

राज्यातील फळबाग लागवड (हेक्टर) आणि अनुदानावरील खर्च (कोटींत) 

वर्ष लागवड खर्च 
२०१८-१९ १२१८३ ८० 
२०१९-२० १७३११ ८३ 
२०२०-२१ ३७५०० १२१.६४ लाख 

इतर अॅग्रो विशेष
७२ तासांची सक्ती नको ः आयुक्तपुणे ः विमा कंपन्यांनी कामकाजात तातडीने सुधारणा...
पीकविमा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळपुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या माध्यमातून...
अखेर ‘इफ्को टोकियो’ विरोधात गुन्हा दाखलअमरावती : राज्य शासनाने केलेल्या करारानुसार इफ्को...
पळवाटांमुळे पीकविमा भरपाई दुरापास्तशेतकऱ्यांकडून पीकविम्याचा हप्ता भरतेवेळी...
विमा कंपन्यांबाबत सरकारची बोटचेपी भूमिकापीकविमा योजनेमुळे शेतकऱ्यांऐवजी पीकविमा कंपन्याच...
मराठवाड्यात एक लाख हेक्टरवर पीकनुकसानऔरंगाबाद : मराठवाड्यातील आठपैकी सहा जिल्ह्यांत...
पावसाची उसंत, सावरण्याची धडपड सुरु पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
विमा कंपन्यांचा राज्यभर सावळागोंधळ पुणे ः पंतप्रधान पीकविमा योजनेतील खासगी विमा...
कोकणात मुसळधारेची शक्यता पुणे : कोकणसह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी...
सोयाबीनने गाठला दहा हजारांचा ऐतिहासिक...अकोला/लातूर ः गेले काही महिने सोयाबीनला चांगला दर...
विदर्भात कृषी अधिकाऱ्यांनीच घेतले विमा...नागपूर ः जिल्हास्तरावर आमचे कार्यालय आहे, हे...
मराठवाड्यात पीकविम्याबाबत शेतकऱ्यांसमोर...औरंगाबाद : पीकविमा उतरविण्याची सोय त्यासाठी जागर...
खानदेशात पीकविमा कंपनीचे कार्यालयच नाही जळगाव : खानदेशात पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
केव्हीकेने दाखवली ‘वीडर’ची पॉवर, छोट्या...मजूरटंचाई व वाढलेले मजूरदर लक्षात घेऊन ममुराबाद (...
दिशा कार्यक्षम पूर व्यवस्थापनाची!महाराष्ट्र देशी सध्या अतिवृष्टी आणि ...
लातूरला सोयाबीन ९१४१ रुपये !लातूर ः येथील लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न  ...
कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात चक्रिय...
पीक विम्यात चुकीचे प्रकार खपवून घेणार ...नाशिक: पीकविमा कंपन्यांकडून पाच पाच जिल्ह्यांसाठी...
केंद्राच्या काळ्या कायद्यांची आम्हाला...नवी दिल्ली ः कायद्याच्या प्रक्रियेतून न आलेल्या...
धरण क्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : तीन दिवसांपासून राज्यातील धरणक्षेत्रात...