Agriculture news in Marathi horticulture producers sacred about climate change | Agrowon

ढगाळ हवामानामुळे फळबाग उत्पादक धास्तावले

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

पुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पुन्हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ हवामान झाले आहे. यामुळे फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले असून, पाऊस आल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

पुणे ः आॅक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसाने फळबागा व शेतीला मोठा फटका बसला. त्यानंतर पुन्हा गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढगाळ हवामान झाले आहे. यामुळे फळबाग उत्पादक चांगलेच धास्तावले असून, पाऊस आल्यास पुन्हा नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.

अवकाळी पावसामुळे द्राक्षे, डाळिंब, सीताफळ, पेरू, अंजीर या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. आता कुठे शेतकरी सावरत असताना गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यांच्या बहुतांशी भागात ढगाळ वातावरण तयार झाले आहे. येत्या एक ते दोन दिवस हवामान ढगाळ राहण्याचा अंदाजही हवामान विभागाने दिला असून, तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. 

गेल्या दोन महिन्यांपासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील दहा ते वीस हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यातच आता पुन्हा ढगाळ वातावरणाामुळे या बागा संकटात सापडण्याची शक्यता बळावली आहे. या शिवाय डाळिंब, बाजरी, मका, ज्वारी, कांदा पिकांनाही ढगाळ हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. 

अवकाळी पावसाच्या संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. पुणे जिल्ह्यात सुमारे दहा ते पंधरा हजार हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील नारायणगाव, बारामती, इंदापूर, दौंड या तालुक्यांतील परिसरात अनेक शेतकरी द्राक्षांच्या थॉमसन, शरद, फ्लेम, सोनाका, फनटासी, क्रिमसन या वाणांच्या द्राक्षेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात. थंडी आणि ढगाळ हवामानामुळे फुलोरा संकटात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 

द्राक्षांचे मणी तडकण्यास सुरुवात झाली आहे. फुलगळ व फळगळसारख्या नुकसानीचा सामनाही शेतकरी करीत आहेत. फुलोऱ्यात पाणी साचले तर द्राक्ष घड कुजण्याची भीती आहे. तर ढगाळ वातावरणामुळे अतिरिक्त पावडर फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. तसेच पुरंदर, इंदापूर, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, खेड, दौंड, बारामती या भागांतही डाळिंबाचे मोठे नुकसान झाले आहे. आता पुन्हा ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांपुढे नवी आव्हाने उभी ठाकली आहेत.

गेल्या एक महिन्यापूर्वी होणारा सततचा पाऊस, धुके व ढगाळ वातावरणामुळे पुणे जिल्ह्यातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रतिकूल हवामानामुळे फुलोऱ्यातील द्राक्ष बागांचे घड आणि फळकुजीमुळे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. द्राक्षावर डाऊनीचे प्रमाण वाढल्याने फवारणीचा खर्च वाढला असून, अनेक फवारण्या करूनही उपयोग होत नसल्याने द्राक्ष उत्पादक हतबल झाले आहेत. घड कुजीच्या समस्येमुळे उत्पादनावर ५० टक्के नुकसान झाले आहे. 
- जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, द्राक्ष उत्पादक संघ


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...