agriculture news in Marathi, horticulture in trouble due to drought, Maharashtra | Agrowon

संकटातील फळबागा वाचविण्याची धडपड

टीम अॅग्रोवन
सोमवार, 15 एप्रिल 2019

आटते पाणीसाठे व जलस्रोत पाहता अनेक वर्षे जोपासलेल्या फळबागांवर भीषण संकट आहे. परंतू दुष्काळी परिस्थितीत तज्ज्ञांनी सांगितलेले फळबागांचे व्यवस्थापन, पाचट, प्लॅस्टिक आच्छादन, पोटॅशिअम नायट्रेटच्या फवारण्या केल्यास जिवापाड सांभाळलेल्या बागा वाचविता येतील.
- बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जालना

जालना: जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाच्या वतीने फळबाग वाचवा अभियान हाती घेतले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जवळपास पाच हजार हेक्‍टर क्षेत्रावरील फळबागांमध्ये आच्छादनाचा प्रयोग राबविण्यात आला आहे.

 यंदाचा दुष्काळ मराठवाड्यातील फळबागांसाठी कर्दनकाळ ठरू पाहत आहे. पाण्याचे भीषण संकट, दरदिवशी आटत चाललेले स्रोत यंदा बागा वाचतील की नाही, असा प्रश्न उपस्थित करत आहेत. जालना जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र जवळपास २४ हजार ४३० हेक्‍टरवर विस्तारले आहे. त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, मोसंबी आदी फळपिकांच्या बागांचा समावेश आहे. जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, जालना, मंठा, बदनापूर तालुक्‍यातील, मोसंबी, डाळींब, द्राक्ष बागा संकटात सापडल्या आहेत.

शिवाय नव्याने झालेली  लागवडही पाणी कमतरतेमुळे संकटात सापडली आहे. टॅंकरने पाणी आणून बागा जगविण्यासाठीची आर्थिक क्षमता फारच थोड्या शेतकऱ्यांकडे आहे. शिवाय दरदिवशी आटत चालेल्या जलस्रोतांमुळे त्यांनाही दुरवरून किती पाणी आणून बागांना घालायचे यावरही मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उपलब्ध पाणी सूक्ष्म सिंचन तंत्राचा उपयोग करून बागा वाचविता येतील का यासाठी कृषी विभागाने ''वाचवा अभियान'' हाती घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार फळबाग वाचवा अभियानांतर्गत आतापर्यंत घनसावंगी तालुक्‍यातील बोधलापूरी शिवारातील जवळपास १६० हेक्‍टरवर फळबागा वाचविण्यासाठी आच्छादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. याशिवाय बाचेगाव शिवारात १८० हेक्‍टरपैकी ९० हेक्‍टरवर तर वडी, रामसगाव शिवारातील ९० हेक्‍टर फळबागांपैकी जवळपास ५० हेक्‍टर फळबागांवर आच्छादनाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

फळबाग वाचवा अभियानात सुचविलेल्या उपायांची अंमलबजावणी कशी करावी याविषयी माहितीपत्रकाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सजग करण्याचे काम केले जात असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. 

झाडांच्या वयोमानानुसार फेब्रुवारी ते जुनदरम्यान प्रतिझाड, प्रतिदिन सूक्ष्म सिंचनाद्वारे नेमके किती लिटर पाणी लागते याची माहिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. फळबाग वाचवा अभियानाच्या माध्यमातून फळबागायतदारांपर्यंत पोचविण्याचे काम केले आहे. शिवाय दीर्घ मुदतीसाठी करावयाच्या उपाययोजना माहिती पत्रकाच्या रूपाने फळबागायतदारांपर्यंत पोचविण्याचे काम कृषी विभाग व आत्माच्या माध्यमातून केले जात आहे. 

अभियानात यावर दिला जातो आहे भर 

  • आच्छादनाचा वापर 
  • मडका सिंचनाचा उपयोग 
  • सलाइनच्या बाटल्यांचा वापर 
  • खोडास बोर्डोपेस्ट लावणे 
  • बोर्डोपेस्टचा वापर करताना घ्यावयाची काळजी 
  • झाडांचा पनोळा, फळ संख्या कमी करणे

     


इतर बातम्या
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत केंद्रांवरील...औरंगाबाद : बाजारात हमी दरापेक्षा कमी दराने तुरीची...
ग्रामीण भागात आरोग्यसेवा द्या : भगतसिंह...नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान...
रत्नागिरी दूध संघाकडून १ कोटी २० लाख...रत्नागिरी : जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील चाळीस...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
बीड जिल्ह्यातील चिंचवडगावमध्ये...बीड: थंड प्रदेशात घेतले जाणारे स्ट्रॉबेरीचे...
सांगली, कोल्हापूरसाठी विशेष पॅकेज : डॉ...सांगली : ‘‘महापूराने सांगली, कोल्हापूर जिल्ह्याचे...
वीज दरवाढीबाबत चार फेब्रुवारीला हरकती...मसूर, जि. सातारा ः महावितरणचा २०.४ टक्के वीज...
उत्पादकतेबरोबर विक्री कौशल्यही आवश्‍यक...सोलापूर : "उत्पादकतेबाबत शेतकरी बऱ्यापैकी सजग...
नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचीही...मेढा, जि. सातारा : नियमित कर्जफेड करणाऱ्या...
कुलगुरू डॉ. विलास भाले यांना हरितरत्न...अकोला  ः नवी दिल्ली येथील अखिल भारतीय कृषी...
अकोले तालुका गैरव्यवहार प्रकरणी तीन...नगर ः अकोले तालुक्‍यातील पाच ग्रामपंचायती व...
मोहोळ येथे शेतकऱ्यांनी बॅंक...मोहोळ, जि. सोलापूर : अतिवृष्टीमुळे मोहोळ तालुक्‍...
राज्यातील ५०० कार्यालयांत शेतकरी...मुंबई : शेतकरी बांधवांना अडचणी मांडण्यासाठी,...
बॅंकांनी रोखली गटशेतीची वाट :...नागपूर  ः गटशेती योजनेचे अनुदान ६०...
हवामान बदल सहनशील वाण संशोधनाला मिळणार...परभणी: बदलत्‍या हवामानात शाश्‍वत उत्‍पादन...
ग्रामपंचायतींमध्ये राष्ट्रीयदिनी...मुंबई ः राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत...