agriculture news in marathi, horticulture under threat due to lack of rain, nashik, maharashtra | Agrowon

नाशिक जिल्ह्यात पावसाअभावी फळबागांवर संकट

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 जुलै 2019

नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यातील एकूण फळबागांचे क्षेत्र १ लाख १० हजार १९ हेक्टर आहे. मात्र दुष्काळामुळे डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळाच्या बागा पाण्यावाचून जळून गेल्या आहेत. पाणीसाठा संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन बागा जगविल्या. मात्र लाखो रुपये खर्च करून हाती काहीच नाही. पाणीटंचाईमुळे बागांवर कुऱ्हाड चालविण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.

नाशिक : कळवण, देवळा, मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला आणि बागलाणमध्ये समाधानकारक पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यातील एकूण फळबागांचे क्षेत्र १ लाख १० हजार १९ हेक्टर आहे. मात्र दुष्काळामुळे डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, सीताफळाच्या बागा पाण्यावाचून जळून गेल्या आहेत. पाणीसाठा संपल्याने अनेक शेतकऱ्यांनी विकतचे पाणी घेऊन बागा जगविल्या. मात्र लाखो रुपये खर्च करून हाती काहीच नाही. पाणीटंचाईमुळे बागांवर कुऱ्हाड चालविण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर आली आहे.

जिल्ह्यात जुलैमध्ये पावसाला सुरवात झाली. नाशिक, त्र्यंबकेश्‍वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ आदी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे गंगापूर व दारणा समूहातील धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. तरीही जिल्ह्यातील २४ धरणांचा जलसाठा केवळ २५ टक्के आहे. त्यामध्ये एकूण जलसाठा १६२८६ दलघफू आहे. पालखेड समूहात ६७१ दलघफू ( ८ टक्के), तर गिरणा खोऱ्यात १३७६ दलघफू (६ टक्के) साठा आहे. त्यामुळे या धरण क्षेत्रात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. यापैकी पुणेगाव, तिसगाव, भोजापूर, चनकापूर, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही धरणे कोरडी आहेत. 

काही भागांत पेरण्या झाल्या आहेत. तरीही जिल्ह्याच्या पूर्व भागात ढेकूळ ही फुटलेले नाहीत. १२ जुलैअखेर ५ लाख ७५ हजार ५८८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्रापैकी २ लाख ७० हजार ५३५ हेक्टर क्षेत्रावर ४७ टक्के पेरण्या झाल्या आहेत. मात्र, वेळेवर पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता आहे. 

पाणीटंचाईचे संकट कायम

चांगल्या पावसामुळे आदिवासी तालुक्यामध्ये पाण्याचे टँकर बंद झाले. जिल्ह्यात अजूनही कळवण, मालेगाव, चांदवड, बागलाण, नांदगाव, येवला आणि देवळा तालुक्यांत मात्र, समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. परिणामी या तालुक्यांना टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे. सद्य:स्थितीत सुमारे ८७५ गावे-वाड्यांना २७० टँकरच्या माध्यमातून पुरवठा होत आहे.


इतर ताज्या घडामोडी
अंजीर-सिताफळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ...पुणे : महात्मा फुले कृषी विद्यापिठाच्या ...
तोलाई मजुरीसाठी सांगली बाजार समितीच्या...सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तोलाई...
परभणी जिल्ह्यात सिंचनाची ५० कोटींवर...परभणी : जिल्ह्यातील लघू, मध्यम, मोठ्या...
खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी...जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत साडेआठ...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड या तीन...
अमरावती विभागात सहा लाख ८३ हजार शेतकरी...अमरावती ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
एम्प्रेस गार्डनच्या पुष्पप्रदर्शनाला...पुणे ः एम्प्रेस बोटॅनिकल गार्डनच्या वतीने आयोजित...
अकोल्यात भारिप, वाशीममध्ये...अकोला ः जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष...
पुणे जिल्ह्यात उद्या पल्स पोलिओ लसीकरण...पुणे : पोलिओच्या आजाराचे उच्चाटन करण्याच्या...
पत्नीच्या नावे कामकाजासाठी येणाऱ्या...बुलडाणा ः स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना...
पाणी, शेती विकासासह समाजकारणाला...नगर : निवडणुकीत पराभव मी मानत नाही. लोकांचे...
पुणे जिल्ह्यात ज्वारी पिकावर चिकट्याचा...पुणे ः पुणे जिल्ह्याच्या पश्चिम जिरायत भागात...
प्रशासकीय कामकाज सेवा हमी कायद्यानुसार...अकोला ः शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत...
वीज रोहित्र ४८ तासांत बदलून द्या;...अकोला ः वीज रोहित्रांबाबत शेतकऱ्यांच्या असंख्य...
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना न्याय न...मुंबई ः केंद्र सरकारचे कृषीविषयक धोरण सातत्याने...
पुणे, मुंबई बाजार समितीच्या निवडणुका...पुणे ः उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू असलेल्या...
फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट...मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट...
शेतीमाल निर्यातबंदी उठवण्यासाठी लढा...औरंगाबाद : शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण...
साखर उद्योग सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील...पुणे ः साखर उद्योगाचे एक चक्र असून, या उद्योगाला...