सरदारांच्या वंशजांकडून शिवछत्रपतींना ८५ रथांद्वारे मानवंदना

Hostility from the descendants of the chiefs to Shiv Chhatrapati by 85 chariots
Hostility from the descendants of the chiefs to Shiv Chhatrapati by 85 chariots

पुणे : फुलांची आकर्षक सजावट असलेला ‘जिजाऊ शहाजी शिवज्योत मुख्य स्वराज्यरथ''... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ८५ स्वराज्यरथ... महाराणी ताराराणी शौर्य पथकातील ५१ रणरागिणींच्या मर्दानी खेळांची चित्तथरारक मानवंदना... ५१ रणशिगांची ललकारी... अन् शिवभक्तांनी केलेला ‘जय शिवाजी जय भवानीचा जयघोष’ अशा उत्साही वातावरणात शिवकाल पुन:श्च एकदा पुण्यामध्ये अवतरला. 

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे लालमहाल येथून शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्याअंतर्गत भव्यदिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. संगीतकार अजय अतुल, महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, मनपा आयुक्त शेखर गायकवाड, समितीचे प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड, सुनेत्रा पवार, उद्योजक पुनीत बालन, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, आमदार दिलीप मोहिते, चेतन तुपे, सिद्धार्थ शिरोळे, संग्राम थोपटे, संजय जगताप, भीमराव तापकीर, अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, दिगदर्शक दिग्पाल लांजेकर, टीम फतेशिकस्त, रघुनाथजी येमूल, विलास वाहणे तसेच सर्व स्वराज्यघराण्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते  लालमहालातील जिजाऊंच्या पुतळ्याला पुष्पहार घालून जिजाऊशहाजी रथावरील शिवज्योत प्रज्वलन करीत मिरवणुकीला सुरुवात झाली. या वेळी अ‍ॅड. प्रताप परदेशी, प्रवीण परदेशी आदी उपस्थित होते.

सरसेनापती, सरदार, सुभेदार, स्वराज्यसेनानी, वीर मावळे आणि वीर मातांच्या तब्बल ८५ स्वराज्यरथांचा सहभाग या मिरवणुकीत होता.

समितीच्या जिजाऊ मॉसाहेब, शहाजी महाराज शिवज्योत मुख्य स्वराज्यरथाच्या नेतृत्वाखाली सरसेनापती वीर बाजी पासलकर, सरदार कान्होजी नाईक जेधे, सरदार नाईक बांदल, सरनौबत सेनापती येसाजी कंक, सरदार नरवीर तानाजी मालुसरे, मानाजी पायगुडे, कान्होजी कोंडे, बाबाजी ढमढेरे, पिलाजीराव सणस, हैबतराव शिळीमकर, त्र्यंबकराव नाईक निवगुणे, सरलष्कर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे स्वराज्य रथ गौरवशाली इतिहास मांडला. या मिरवणुकीत शिवप्रेमी भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com