हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून सुरु

कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट आणि बार तसेच फूडकोर्ट ५ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. मात्र सर्व हॉटेल्‍स त्‍यांच्या ५० टक्‍के क्षमतेनेच सुरु राहतील.
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून सुरु
हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार ५ ऑक्‍टोबरपासून सुरु

मुंबई : कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्यभरातील हॉटेल्‍स, रेस्‍टॉरंट आणि बार तसेच फूडकोर्ट ५ ऑक्टोबरपासून खुली होणार आहेत. मात्र सर्व हॉटेल्‍स त्‍यांच्या ५० टक्‍के क्षमतेनेच सुरु राहतील.

राज्‍यांतर्गत चालणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्‍वेगाड्याही सुरु होणार आहेत. मुंबईतील लोकल गाड्यांच्या फेऱ्या वाढणार असून मुंबईच्या डबेवाल्‍यांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. तसेच पुणे विभागातील लोकल सेवाही सुरू होणार आहे.

कोरोना साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर राज्यात १ जूनपासून 'मिशन बिगिन अगेन' सुरू करण्यात आले. गेल्या चार टप्प्यात दुकाने, उद्योग व्यवसाय, दळणवळण, निवासी हॉटेल्स, लॉज पूर्ववत सुरू करण्यात आले.मात्र, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बारसह व्यायामशाळा, नाट्यगृहे, चित्रपटगृह, तरण तलाव आदींवर निर्बंध कायम होते.

या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी हॉटेल चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या बैठकीत हॉटेल, रेस्‍टॉरंट तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती. राज्‍य सरकारने ही मागणी मान्य केली आहे. त्यानुसार ५ ऑक्‍टोबरपासून हॉटेल, रेस्‍टॉरंट, बार आणि फूडकोर्ट त्‍यांच्या ५० टक्‍के क्षमतेने सुरू होणार आहेत. म्‍हणजेच जर हॉटेलची क्षमता १०० ग्राहक बसण्याची असेल तर तिथे ५० ग्राहकच बसू शकणार आहेत. अंतर नियमासह सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. यासंदर्भात पर्यटन विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील सर्व औद्योगिक आणि उत्पादक युनिटही सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची आवश्यकता पाहता सर्व ऑक्सिजन पुरवठा करणा-या वाहनांना कोणत्‍याही आडकाठी शिवाय २४ तास वाहतुकीची परवानगी देण्यात आली आहे. ऑक्सिजन निर्माते आणि पुरवठादार यांच्यावरही कोणतेही निर्बंध टाकण्यात येणार नाहीत.

३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

  • शाळा, महाविद्यालय,शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस
  • मेट्रो सेवा, चित्रपटगृह, नाट्यगृह, तरणतलाव, व्यायामशाळा, मनोरंजन पार्क, सभागृह
  • मंदिर, मशीदसह सर्व प्रार्थना स्थळे
  • सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजनाचे कार्यक्रम
  • आंतरराष्ट्रीय प्रवासाला बंदी, केवळ केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीने प्रवासाला मुभा
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com