Agriculture news in Marathi Hotels, lodges will start from tomorrow | Agrowon

हॉटेल्स, लॉज उद्यापासून सुरू होणार

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 जुलै 2020

मुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून राज्यात हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. लॉज, गेस्ट हाउस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स ३३ टक्के क्षमतेसह चालवण्याची परवानगी देण्यात आली. मुख्य सचिव संजय कुमार यांनी सोमवारी याबाबतचे आदेश जारी केले. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये सध्यातरी हॉटेल आणि लॉज सुरू करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.

मुंबई : तब्बल साडेतीन महिन्यांनंतर ८ जुलैपासून राज्यात हॉटेल आणि लॉज सुरू होणार आहेत. लॉज, गेस्ट हाउस अशा सुविधा पुरवणारी कंटेन्मेंट झोनबाहेरील हॉटेल्स ३३ टक्के क्षमतेसह चालवण्याची परवानगी देण्यात आली. मुख्य सचिव संजय कुमार यांनी सोमवारी याबाबतचे आदेश जारी केले. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये सध्यातरी हॉटेल आणि लॉज सुरू करता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे.

जर या संस्था क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरात असल्यास महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाच्या पुढील आदेशापर्यंत त्या क्वारंटाइन सुविधेसाठीच वापरल्या जातील किंवा त्यांचा उर्वरित भाग (६७ टक्के) महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरला जाऊ शकतो, असेही यात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव आणि इतर अधिकाऱ्यांची हॉटेल असोसिएशनसोबत रविवारी (५ जुलै) एक व्हिडिओ कॉन्फ्ररन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत हॉटेल आणि लॉज सुरू करण्यावर हॉटेल असोसिएशनच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली होती. या वेळी लवकरच हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

प्रवेश देताना काही नियम घालून दिले आहेत. त्यामध्ये कोव्हीडची लक्षणे नसलेल्या व्यक्तींनाच प्रवेश, फेस मास्क असल्यासच प्रवेश, हॉटेलमध्ये असताना संपूर्ण वेळ मास्क घालणे आवश्यक. आरोग्य सेतू अ‍ॅपची ग्राहकांना सक्ती करण्यात आली आहे.


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...
सोलापूर जिल्ह्यात मूगाची पाने पिवळी पडू...सोलापूर  ः जिल्ह्यात पावसाने वेळेवर हजेरी...
प्राथमिक शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या...कुसुंबा, जि. धुळे ः सर्वांत मोठा नोकर वर्ग म्हणून...
बार्शीतील रेशनच्या धान्य...सोलापूर  ः बार्शी तालुक्यातील रेशनचे धान्य...
शेत जमिनीच्या मोजणीसाठी चार हजार...सोलापूर ः पती-पत्नीच्या नावावर असलेल्या...
‘आयआयएचआर’चे बियाणे आता ऑनलाइन नाशिक : भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या बंगळुरू...
मराठवाड्यात पीक कर्जाचे ४०.८३ टक्केच...औरंगाबाद : मराठवाड्यात शेतकऱ्यांना खरीप पीक...
पुणे जिल्ह्यातील सहा धरणांत ८०...पुणे ः धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम...
सातारा जिल्हा बँकेतर्फे १३४ टक्के...सातारा : जिल्हा वार्षिक पत आराखाड्यात २०२०-२१...
जनावरांमध्ये `लंपी स्किन`चा संसर्ग नांदेड  ः अर्धापूर परिसरात गाय, बैल आदी...
नांदेड जिल्ह्यातील एक लाख ९२ हजार...नांदेड  ः यंदा जिल्ह्यातील २ लाख ६८ हजार...
ओसंडून वाहतोय आडोळ प्रकल्पशिरपूरजैन, जि. वाशीम ः दमदार पावसामुळे येथील आडोळ...
काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब, पाणी साठ्यात...अकोला ः यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत वेगवेगळ्या...
अकोला जिल्ह्यात युरिया खताचा वापर वाढलाअकोला ः जिल्ह्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत...
राधानगरी धरणाचे दोन दरवाजे खुलेचकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील...
नाशिक शहरात बैलपोळा साहित्याच्या...नाशिक : गेल्या वर्षांपासून शेतीमालाचे नुकसान व...
मालेगाव तालुक्यात भाजीपाल्यासह खरीप...नाशिक : मालेगाव तालुक्यातील पश्चिम भागात झालेल्या...
येलदरीच्या दोन दरवाजातून विसर्गपरभणी : बुलडणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणातील...
सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलासांगली ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे....
नाशिकमध्ये ढोबळी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...