agriculture news in marathi, houses and crop damage due to stromy winds, nagar, maharashtra | Agrowon

कान्हूरपठार, करंदी परिसरात वादळी वा-यामुळे नुकसान
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 मे 2019

टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर तालुक्यातील करंदी, कान्हूरपठार परिसरातील गणपती फाटा रोडवरील झाडे बुधवारी (ता.२२) वादळी वाऱ्यामुळे पडल्याने पारनेर-कान्हूरपठार रोडवरील वाहतुक तीन तास ठप्प झाली होती. या भागात काही प्रमाणात पाऊस झाला.

टाकळी ढोकेश्वर, जि. नगर  ः पारनेर तालुक्यातील करंदी, कान्हूरपठार परिसरातील गणपती फाटा रोडवरील झाडे बुधवारी (ता.२२) वादळी वाऱ्यामुळे पडल्याने पारनेर-कान्हूरपठार रोडवरील वाहतुक तीन तास ठप्प झाली होती. या भागात काही प्रमाणात पाऊस झाला.

बुधवारी सायंकाळी पाच वाजेदरम्यान वादळी वा-यासह पाऊस सुरू झाल्याने घरांवरील पत्रे उडल्याने नुकसान झाले आहे. करंदी येथील विश्वनाथ गव्हाणे यांच्या घराचे पत्रे उडल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनास्थळी करंदीचे उपसरपंच भास्कर गव्हाणे यांनी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली आणि याबाबतची माहिती प्रशासनाला देऊन या नुकसानीचा पंचनामा करण्यास सांगितले. कान्हूरपठार येथील भागवतमळा परिसरातील वरूंडीमाता रोडवरील महावितरणचा ट्रान्सफॉर्मर वादळी वाऱ्यांमुळे उन्मळून पडला.

करंदी रोडवरही मोठ्या प्रमाणात झाडे पडल्याने तो रस्ता वाहतूकीसाठी बंद होता. पारनेर व टाकळी ढोकेश्वर येथे जाणारी सर्व वाहतूक विरोलीमार्गे ग्रामस्थांनी वळविल्याने काही काळ वाहतूक सुरळीत झाली. कान्हूरपठार परिसरातील स्वप्निल सोमवंशी यांच्या आंबा पिकाचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानीचे पंचानामे करण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.

इतर बातम्या
बीड, उस्मानाबादमध्ये चारा छावण्यांत ३९...उस्मानाबाद, बीड : पावसाची अवकृपा कायम...
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
वनस्पतीतील कडवटपणांमागील रहस्यांचा...कडूनिंबासह अन्य अनेक वनस्पतीमधील कडवट, तीव्र...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
शेततळ्याच्या प्लॅस्टिकला तूर्त अनुदान...पुणे  : शेततळ्याच्या अस्तरीकरणाकरिता...
वारणा-कृष्णा नदीकाठच्या शेतजमिनी कोसळू...सांगली ः सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा...
जालना जिल्ह्यात वीस हजार शेतकऱ्यांच्या...जालना : जिल्ह्यातील १२० गावांत हवामान अनुकूल...
दर्जाहीन शिक्षण संस्थांवर कारवाई होणार...पुणे: राज्यात दर्जाहीन कृषी महाविद्यालये...
अवर्षणप्रवण, आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांत...अकोला ः राज्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र,...
महिनाअखेरीस पावसाला पोषक हवामानपुणे : ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला राज्यात दमदार...