agriculture news in marathi, houses damage due to heavy rain, gadchiroli, maharashtra | Agrowon

गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७ घरांची पडझड

टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. या संदर्भातील माहिती संकलनाचे काम अद्यापही सुरूच असल्याने पडझड झालेल्या घरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. 

गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. या संदर्भातील माहिती संकलनाचे काम अद्यापही सुरूच असल्याने पडझड झालेल्या घरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. 

गडचिरोली जिल्ह्यात २४ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. जुलैअखेरपर्यंत पाऊस कोसळत होता. या दरम्यान अनेक तालुक्‍यांत वारंवार अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. ग्रामीण भागातील मातीच्या कच्च्या घरांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, २० पक्‍की व कच्ची घरे पूर्णतः कोसळली आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्‍यातील १५, आरमोरी तालुक्‍यातील चार, तर सिरोंचा तालुक्‍यातील एका घराचा समावेश आहे. २२ पक्‍क्‍या घरांची अंशतः पडझड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ घरे सिरोंचा तालुक्‍यातील आहेत. अंशतः पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे १ हजार ५३६ कच्ची घरे आहेत.

११६ जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. पुरात २४ मोठी दुधाळ जनावरे, सात लहान तर ओढ काम करणारी ३६ मोठी जनावरे वाहून गेली आहेत. राज्य शासनाच्या महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. सदर रक्‍कम तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याचे काम सुरू आहे. ज्या भागात पंचनामे झाले त्यांना आर्थिक मदतसुद्धा दिली जात आहे.

जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांना अतिवृष्टीमुळे पूर आला. त्यासोबतच अतिवृष्टीमुळे आतापर्यंत विविध घटनांमध्ये जिल्ह्यातील आठ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा व भामरागड तालुक्यांतील प्रत्येकी एक, तर अहेरी, आरमोरी तालुक्‍यांतील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे.


इतर ताज्या घडामोडी
सांगलीत साखरेचे उत्पादन १८ लाख...सांगली ः जिल्ह्यातील यंदा गाळप हंगाम नुकताच पंधरा...
कृषिमंत्री अकोल्यात उद्या घेणार खरीप...अकोला ः राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे बुधवारी (ता...
बाहेरून आलेल्यांचे विलगीकरणाची जबाबदारी...पुणे  : `कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
शेतीविषय तंत्रज्ञान प्रसारासाठी प्रसार...नगर  ः बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांपुढील...
उसाची एफआरपी तीन हजार रुपये करण्याची...कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेचा किमान दर...
कोल्हापूर जिल्ह्यात धूळवाफ पेरणीस...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात धूळ वाफ पेरण्यास...
चंद्रपुरात खरिपासाठी २९ हजार टन खते...चंद्रपूर ः गेल्या हंगामात खत टंचाईचा सामना...
कळंब बाजार समिती पावसाळ्यापूर्वी करणार...यवतमाळ ः पावसाळ्यापूर्वी कापूस विकला जाईल किंवा...
चाकण येथील जनावरांचा बाजार शनिवारपासून...पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंका...यवतमाळ ः कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन जाहीर...
बांबूपासून अगरबत्ती उद्योगातून महिलांना...यवतमाळ ः अगरबत्ती आणि लाखेपासून बांगड्या...
विदर्भात मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे...नागपूर ः संचारबंदीत मिळालेल्या शिथिलतेमुळे...
कृषी पदवीधर ग्रामसेवकांना तांत्रिक...पुणे  ः राज्यातील कृषी पदवीधर ग्रामसेवकांना...
उन्हाळ्यात वन्यजिवांसाठी पाण्याची सोय...अमरावती ः उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याअभावी...
पुणे बाजार समितीतील भुसार बाजार सुरुपुणे  : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील...
नाशिक बाजार समिती आजपासून तीन दिवस बंद नाशिक : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवटी मुख्य...
घोडगंगा साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण...पुणे ः न्हावरे (ता. शिरूर) येथील...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस प्रारंभसातारा : जिल्ह्यात आले लागवडीस प्रारंभ झाला...
सोलापुरात कारहुणवीनिमित्त निघणारी...सोलापूर  ः सोलापूर परिसर, दक्षिण सोलापूर आणि...
सोलापुरात १३ हजारांवर शेतीपंपांच्या...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांना...