जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
कोपुरली येथे आदिवासी पाड्यावर मधमाशीपालनासाठी वसाहती
नाशिक : केंद्रीय खादी ग्रामोद्योग विभागाच्या वतीने पेठ तालुक्यातील कोपुरली येथे मधमाशीपालन करण्यसाठी मधमाश्यांच्या वसाहती उभारण्यात आल्या आहेत. या ठिकाणी केंद्रीय खादी ग्रामोद्योग विभागाचे अध्यक्ष व्ही. के. सक्सेना, सह मुख्य कार्यकारी अधिकारी वाय.के.बारामतीकर यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.
मधमाशी पालनाला अनुकूल वातावरण असल्याने येथे व्यवसाय वाढविण्यासाठी सक्सेना यांनी अनुकूलता दाखविली. मधमाशी पालन क्षेत्राला भेट देत येथील कामकाजबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तसेच मधमाशी व्यवसाय करण्यासाठी इच्छूक आदिवासी बांधवांशी संवाद साधला.

खादी ग्रामोद्योगच्या माध्यमातून कृषीपूरक उत्पादनाला चालना मिळावी, यासाठी प्रयत्न करत सुरू असल्याचे सक्सेना यांनी यावेळी सांगितले. मधमाशी पालन व्यवसायांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येत आहे. मध उत्पादकांना चालना मिळावी, यासाठी काम सुरू करण्यात आले आहे.
आगामी काळात मधमाशीपालन प्रशिक्षण खादी ग्रामोधोगमार्फत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी वनराज शेतकरी कंपनी यासाठी समन्वय साधणार आहे. सुशिक्षित, बेरोजगारांना लाभ मिळवून देणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष यशवंत गावंडे यांनी दिली. यासाठी वनराज फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे सभासद व्हावे लागेल, या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केली.
वसाहती वाढवून शेतकऱ्यांना देणार
मधमाशांच्या वसाहती वाढवून त्या शेतकऱ्यांना देण्यासाठी वनराज शेतकरी उत्पादक कंपनी काम करणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात २० तरुणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या भेटीप्रसंगी माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, नितीन पाटील, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते. यासह वनराज शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष यशवंत गावंडे, तुषार बिरारी, छबिलदास जाधव व कंपनीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- 1 of 1022
- ››