शासन निर्णय असूनही बँकानी पीकविमा रोखला कसा : 'स्वाभिमानी'चा प्रश्न

बुलडाणा ः गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खरीप सोयाबीन पीकविम्याची रक्कम जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम विनाविंलब शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीने लावून धरली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. २९) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांची भेट घेत या विषयावर दोन तास चर्चा केली.
How the bank stopped crop insurance despite the ruling
How the bank stopped crop insurance despite the ruling

बुलडाणा ः गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या खरीप सोयाबीन पीकविम्याची रक्कम जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज खात्यात जमा केली आहे. ती रक्कम विनाविंलब शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानीने लावून धरली आहे. याच अनुषंगाने शुक्रवारी (ता. २९) संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांची भेट घेत या विषयावर दोन तास चर्चा केली. यावेळी ‘स्वाभिमानी’चे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर, घाटाखालील जिल्हाध्यक्ष शाम अवथळे, जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांची उपस्थिती होती.

शासन निर्णय असून बँका शेतकऱ्यांचा पीकविमा कर्ज खात्यात रोखून ठेवत असतील तर अशा बँक अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. पीकविम्याच्या प्रश्नावर जोपर्यंत तोडगा निघणार नाही. तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिकाही यावेळी व्यक्त केली. या प्रश्‍नांवर दोन दिवसात शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा तोडगा काढण्यात येईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्याने दिला.

कोरोना रोगाच्या दहशतीच्या वातावरणात बँकांनी शेतकऱ्यांची खरीप सोयबीन पीकविम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करुन शेतकऱ्यांवर दुहेरी संकट निर्माण केले आहे. या लॉकडाऊनमुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले असून विम्याच्या पैशासाठी शेतकरी बँकेत चकरा घालत आहेत. पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे.

शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी, रासायनिक खते, बी बियाणे, खरेदी करण्याकरिता पैशांची गरज आहे. अशा स्थितीत बँकांनी शेतकऱ्यांचा पीकविमा कर्ज खात्यात जमा करणे पूर्णपणे चुकीचे आहे. २२ मे २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार खरीप पीकविम्याची रक्कम कंपनीने बँकेला अदा केल्यानंतर ७ दिवसांच्या आत बचत खात्यात जमा करणे हे बँकेला बंधनकारक आहे. पंरतु बँका या शासन निर्णयाचे उल्लंघन करीत असल्याचे उघड झाले आहे.

बँकाना शेतकऱ्यांची पीकविम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. त्यामुळे कर्ज खात्यात जमा केलेले शेतकऱ्यांचे पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा करण्याकरिता बँकांना तत्काळ निर्देशित करण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्याने दिले. बँकाकडून पीकविमा शेतकऱ्यांना न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभर आंदोलन करेल, असा इशारा यावेळी प्रशांत डिक्कर, श्याम अवथळे, डॉ. ज्ञानेश्वर टाले, गणेश जुनधळे, पवन मेटांगळे, बालाजी टाले आदींनी निवेदनातून दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com