agriculture news in marathi, How to dump money for sowing? | Agrowon

दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 जुलै 2018

सांगली ः रोहिणी, मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केलीय. वाफसावर उगवण झाली. पण, आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अगोदरच पेरणीसाठी खर्च झाला आहे. त्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळत नाही. तर दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्‍न तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

सांगली ः रोहिणी, मृग नक्षत्रावर खरीप हंगामातील पिकांची पेरणी केलीय. वाफसावर उगवण झाली. पण, आता पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. अगोदरच पेरणीसाठी खर्च झाला आहे. त्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज मिळत नाही. तर दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा, असा प्रश्‍न तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पडला आहे.

जत तालुक्‍यात जून महिन्यात १०६ मिलिमीटर म्हणजे ८१ टक्के इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. परंतु, तीस दिवसांत केवळ सात ते दहा दिवसच पाऊस झाला आहे. या पावसावर तालुक्‍यात ११ हजार ८४२ हेक्‍टरवर खरीप हंगामातील पेरणी झाली आहे. वाफसावर पिकांची उगवण झाली आहे. त्यानंतर पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरी पावसाची वाट पाहू लागला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

शासनाने खरीप हंगामासाठी पीककर्ज उपलब्ध केले आहे. पेरणीसाठी कर्ज घेऊन पिकांची पेरणी केली आहे. मात्र, पाऊस नसल्याने पिकांची उगवणच झाली नसल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. एकदा कर्ज मिळाले. मग दुबार पेरणीसाठी पैसा कुठून आणायचा असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

‘नोकरी सोडून शेती करायला आलोय. शेतात ऊस, मका पिकं आहेत. विहिरीतील पाणी संपले आहे. पण पाऊस नाही. पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. पाऊस पडला नाही तर दुबार पेरणी करायची वेळ येणार आहे.’
- रावसाहेब कोरे,
 युवा शेतकरी, रावळगुंडवाडी, ता. जत

‘अठरा एकर शेती आहे. पेरणीसाठी मशागत करून ठेवली आहे. पाऊस नसल्याने पेरणी केलेली नाही. पाऊस झाला तरच पेरणी करणार आहे.’
- दत्तात्रय गाडकवाड, सोरडी, ता. जत.

 


इतर ताज्या घडामोडी
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...
नंदुरबारमध्ये अनेक भागात पाऊस नंदुरबार ः जिल्ह्यात मागील दोन दिवसांत...
पुण्यातील धरणातून उजनीत १३ हजार ५६...सोलापूर ः उजनी धरणाच्या वरच्या बाजूला...
`पपईचा पिकविमा योजनेत समावेश करा`जळगाव ः खानदेशात कांद्यापाठोपाठ पपईचे...
बार्शीत रेशनचा १५१ पोती गहू, तांदूळ...सोलापूर ः बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
‘माढा, पंढरपूर, माळशिरसमधील...सोलापूर ः ‘‘गतवर्षी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या...
परभणीत ऊस, चारा पिकांवर नाकतोड्याचा...परभणी : वांगी (ता.परभणी) येथील ऊस पीक झालेल्या...
पूर्ण कार्यक्षमतेने ऊस गाळप करण्याचे...नाशिक : ‘‘कादवा सहकारी साखर कारखान्याने जुन्या...
नांदेड जिल्ह्यातील सीएससी केंद्रे सुरू...नांदेड : जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र, आधार...
अकोल्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊसनगर ः दरवर्षी जोरदार पाऊस पडत असलेल्या अकोले...
पुणे जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरीपुणे ः पुणे जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
परभणीत वांगे प्रतिक्विंटल २००० ते ४०००...परभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
बुलडाणा जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांनी...बुलडाणा ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
जायकवाडीत ५५.३२ टक्के उपयुक्त पाणीपैठण, जि. औरंगाबाद : तालुक्यातील जायकवाडी...
नांदेड जिल्ह्यात ९ लाख ४६ हजार पीकविमा...नांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत...
कृषिपंपांना बारा तास वीज पुरवठा करा ः...भंडारा : टाळेबंदी काळातही शेतकऱ्यांनी मोठ्या...