Agriculture news in Marathi How to get a rooftop solar power booster? | Page 3 ||| Agrowon

‘रूफटॉप सौरऊर्जे’ला कसे मिळणार बूस्टर?

टीम अॅग्रोवन
सोमवार, 27 सप्टेंबर 2021

दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा एकदा रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सौरऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्पादक संस्था मात्र अनुत्सुक आहे.

नागपूर ः दीर्घ खोळंब्यानंतर महावितरणने पुन्हा एकदा रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्पांना चालना देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. सौरऊर्जेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उत्पादक संस्था मात्र अनुत्सुक आहे. एकतर शासकीय दर परवडणारे नाहीत, सबसिडी कधी मिळेल तेही अस्पष्ट, त्यात क्लिष्ट आणि गुंतागुंतीची प्रशासकीय प्रक्रिया न परवडणारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अशात रूफटॉप सौरऊर्जेला बूस्टर मिळणार, असा प्रश्‍नच असून, इच्छा असूनही सर्वसामान्य नागरिक त्यापासून लांबच राहिले आहेत. 

शाश्‍वत ऊर्जा म्हणून सौरऊर्जेकडे बघितले जाते. घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना ही यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून ४० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते. संपूर्ण महाराष्ट्रात २५ मेगावॉट सौरऊर्जानिर्मितीचे लक्ष्य ठरवून दिले गेले. एप्रिल २०१९ पासून अचानक अनुदान मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आणि प्रक्रिया खोळंबली. दोन वर्षे लोटूनही योजनेचे काम हवे त्या गतीने पुढे जाऊ शकले नाही. आता पुन्हा योजनेला चालना देण्याचे प्रयत्न महावितरणकडून सुरू झाले आहेत. पण सोलर क्षेत्रातील वितरकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसादच मिळत नाही. 

४७ हजारांचा खर्च ४० टक्के अनुदान 
रूफटॉप यंत्रणेसाठी पाच वर्षांच्या देखभाल दुरुस्ती खर्चासह १ किलोवॉटसाठी ४६ हजार ८२० रुपये, १ ते २ किलोवॉट- ४२ हजार ४७०, २ ते ३ किलोवॉट- ४१ हजार ३८०, ३ ते १० किलोवॉट- ४० हजार २९०, तसेच १० ते १०० किलोवॉटसाठी ३७ हजार २० रुपये प्रति किलोवॉट याप्रमाणे किंमत ठरवून देण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॉटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॉट ते १० किलोवॉटपर्यंत २० टक्के अनुदान मिळते. तसेच सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॉटपर्यंत; परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॉट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी संस्थांना २० टक्के अनुदान मिळणार आहे.

३ ते ५ वर्षांत खर्च भरून निघणार
नेटमीटरिंगद्वारे महावितरणकडून वीज खरेदी केली जाते. वर्षअखेर शिल्लक वीज प्रतियुनिटप्रमाणे हिशेब होतो. दरमहा १०० युनिटपर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलोवॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिलामध्ये सध्याच्या वीजदरानुसार दरमहा सुमारे ५५० रुपयांची बचत होऊ शकेल. वीज वापरानुसार ३ ते ५ वर्षांत यंत्रणा उभारणीच्या खर्च भरून निघू शकते, असा महावितरणचा दावा आहे. 

दोन वर्षांहून अधिक काळापासून महावितरण केवळ २५ मेगावॉटवरच अडकून आहे. ‘मेडा’ने हे लक्ष्य अडीच महिन्यांतच पूर्ण केले होते. सोलर क्षेत्रात कार्यरत ३ हजार इन्स्टॉलरपैकी केवळ २५ जणांनीच महावितरणसोबत कामाची तयारी दर्शविली आहे. त्यांनाही सरकारी दराने काम परवडणारे नाही. म्हणूनच ग्राहकांकडून वेगळ्या रकमेची मागणी केली जाते. योग्य धोरणच नसल्याने ‘पोटेंशिअल’ असूनही या क्षेत्राची वाताहत झाली आहे. 
- साकेत सुरी, सचिव, महाराष्ट्र सोलर एनर्जी मॅनिफॅक्चरर्स असोसिएशन


इतर अॅग्रो विशेष
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर महाविकास...सातारा, सांगली, जळगाव आणि धुळे-नंदूबार जिल्हा...
विकास सोसायट्यांच्या निवडणुकीनंतरच ...पुणे ः राज्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी...
पीकविमा कंपन्यांकडून मिळणारी भरपाई...नांदेड : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक...
राज्याला आदर्श ठरणारी जाधवांची अंजीर...पुरंदर तालुक्यातील गुरोळी (जि. पुणे) येथील...
व्यावसायिक दृष्टिकोनातून पोल्ट्री अन...पवनी (जि. अमरावती) येथे शेती असलेल्या संदीप राऊत...
सोयाबीनच्या दरामध्ये तेजीचा काळअकोला ः गेले काही दिवस दबावात असलेले सोयाबीनचे दर...
गट शेतीला दिलेल्या  अनुदानाचा गैरवापरपुणेः कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची...
तेलबियांच्या क्षेत्रात घटीचा कल कायमनगर ः एकेकाळी तेलबियांचे भरघोस उत्पादन घेण्याऱ्या...
शिराळ्यातील गुऱ्हाळ घरांना घरघर सांगली ः शिराळा तालुक्यातील गुऱ्हाळ घरे दसरा आणि...
अवकाळीचा फळपिकांना मोठा तडाखामागील आठवडाभरापासून राज्यात सुरू असलेल्या अवकाळी...
कापूस दराला पुन्हा उभारीपुणे ः मागील काही दिवसांत अफवांमुळे कापूस बाजारात...
बारामतीत आठशे रोहित्र बंद माळेगाव, जि. पुणे ः ‘कृषी पंप वीज धोरण २०२०’...
एकरकमी एफआरपीसाठी उच्च न्यायालयात याचिका नांदेड : राज्य सरकारने उसाची एफआरपी तीन...
सूक्ष्म सिंचनासाठी सरसकट ८०...पुणे ः सूक्ष्म सिंचनाखालील शेती क्षेत्र...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्रामुळे...
जागतिक बाजारात कच्च्या साखरेच्या दरात... कोल्हापूर : जागतिक बाजारात कच्या साखरेच्या...
भारत-कुवेतदरम्यान बांधला  जातोय कृषी...पुणे ः भारत-कुवेत दरम्यान कृषी निर्यात...
मोदींना लिहिणार खुले पत्रनवी दिल्ली (वृत्तसंस्था) ः देशातील सुमारे ४०...
राज्यातील शेकडो रोपवाटिका मूल्यांकनाविनापुणे ः देशातील फलोत्पादन व भाजीपाला पिकांचा...
पाकिस्तानची कापूस आयात वाढणारपुणे : पाकिस्तानचा कापूस वापर वाढणार असून, आयातही...