वृक्षलागवडी मोहिमेनंतर आता जिवंत रोपांची पाहणी होणार

how many tree planting alive?
how many tree planting alive?

नगर ः राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सरकारने ठेवले होते. ही वृक्षलागवड मोहीम २०१६ पासून सुरू झाली असून, ती चार टप्प्यांत राबविण्यात आली आहे. नगर जिल्ह्याने चारही टप्प्यांत उद्दिष्टपूर्ती केली आहे. या लागवड झालेल्या वृक्षांपैकी किती रोपे जिवंत आहेत, याची पाहणी १ ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान करण्यात येणार आहे. 

पावसाचे प्रमाण केवळ झाडे नसल्याने कमी झाले आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागासह सर्वच ठिकाणी शासनाने गेल्या तीन वर्षांपासून वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांचाही त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी लागवड केलेली किती रोपे जिवंत आहेत हा मोठा प्रश्न आहे. लावलेली रोपे जगविण्यासाठी फारसे प्रयत्न होत नाहीत हे निदर्शनात आले आहे. वृक्ष लागवडीचे २०१६ ते २०१९ या कालावधीत चार टप्पे करण्यात आले आहेत. यामध्ये दोन कोटी, चार कोटी, १३ कोटी व ३३ कोटी अशी वर्गवारी करण्यात आली आहे. 

यामध्ये नगर जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात दहा लाख, दुसऱ्यात २८ लाख, तिसऱ्यात ४९ लाख व चौथ्या टप्प्यात एक कोटी १७ लाखांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. वन विभागासह सरकारी व निमसरकारी कार्यालयांनी ही उद्दिष्टपूर्ती केली आहे. विशेष म्हणजे उद्दिष्टापेक्षा जास्त रोपांची लागवड करण्यात आली आहे. लावलेली किती रोपे जिवंत आहेत, याची माहिती आता राज्य सरकारतर्फे घेण्यात येत आहे. त्यामुळे चार टप्प्यांत लागवड केलेली किती रोपे जिवंत आहेत, याचे सर्वेक्षण एक ते ३१ ऑक्‍टोबरदरम्यान करून तसा अहवाल वन विभागाला सादर करावा, अशा सूचना संबंधित कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. 

वृक्षसंवर्धनाची जबाबदारी कोणाची?  वृक्षलागवडीचे सर्वेक्षण करताना रोप कोठे लावले? त्यापैकी किती रोपे जिवंत आहेत, याची माहिती घेण्यात येणार आहे. त्याचे छायाचित्र घेऊन त्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी कोणावर सोपविलेली आहे, याची माहितीही घ्यावी, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com