agriculture news in marathi, HT jean found in Ankur seads, Maharashtra | Agrowon

‘अंकुर सीड्स’च्या वाणात आढळला ‘एचटी’ जीन
टीम अॅग्रोवन
सोमवार, 30 जुलै 2018

हंगामापूर्वी सर्वच कंपन्यांच्या गोदामातून नमुने एकाचवेळी घेण्यात आले. त्यामुळे गोंधळ उडून नमुने बदलण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. आम्ही शेतकऱ्यांचा विश्‍वास गेल्या अनेक वर्षांत संपादित केला आहे. आमच्या कपाशी वाणांना मागणी असताना आमच्याकडून असे प्रकार होणे शक्‍यच नाही किंवा आम्हाला त्याची गरजही नाही. याविरोधात आम्ही न्यायालयात आमची भूमिका मांडू.
- माधवराव शेंबेकर, व्यवस्थापकीय संचालक,  मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेड, नागपूर

अमरावती ः मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडच्या ३०२८ या कपाशी वाणातच एचटी जीन आढळून आले आहे. १०० पैकी ३० नमुन्यांमध्ये तणनाशकास सहनशील जनुकीय अंश (एचटी) जीन असल्याची धक्‍कादायक बाब अहवालात समोर आल्यानंतर या प्रकरणी विभागीय गुणनियंत्रक डॉ. पंकज चेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे नागपूर येथील व्यवस्थापकीय संचालक व उपप्रादेशिक व्यवस्थापक चिरंजीव रेड्डी यांच्याविरोधात गुन्हे दाखल केले.

महाराष्ट्र कापूस बी-बियाणे नियम २००९ अन्वये या वर्षी पहिल्यांदा बाजारात बियाणे पोचण्यापूर्वीच कंपन्यांच्या गोदामात, प्रक्रिया केंद्रात नमुने घेण्यात आले.  मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडच्या मलकापूर  (जि. बुलडाणा) येथील बीज प्रक्रिया व साठवणूक केंद्रातूनदेखील ३०२८ या बिजी-२ वाणाचे नमुने १५ मे २०१८ रोजी घेण्यात आले. २५ मे २०१८ रोजी हे नमुने विश्‍लेषणाकरिता केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्याकडे पाठविण्यात आले.

१९ जुलै रोजी त्याचा अहवाल प्राप्त झाला. अंकुर सीड्स चे हे बियाणे केंद्र शासनाच्या जनुकीय समितीने निर्बंध घातलेले तणनाशकास सहनशील जनुकीय अंश ३० टक्‍के पॉझिटीव्ह असल्याचे या अहवालाच्या निष्कर्षात नमुद होते. अशा बियाण्याच्या वापरामुळे पर्यावरण तसेच शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कृषी विभागाच्या अमरावती विभागीय गुणनियंत्रण संचालकांनी या संदर्भाने पुणे कृषी आयुक्‍तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. 

अपर मुख्य सचिव विजयकुमार यांनी हे प्रकरण गंभीरतेने घेत या प्रकरणी तत्काळ कारवाईच्या सूचना अमरावती विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या.

पोलिसांनी केले गुन्हे दाखल
दरम्यान, मे. अंकुर सीड्स प्रा. लिमिटेडचे नागपूर येथील व्यवस्थापकीय संचालक; तसेच मलकापूर (जि. बुलडाणा) येथील प्रक्रिया केंद्राचे प्रादेशिक उपव्यवस्थापक चिरंजीव रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अमरावती विभागीय गुणनियंत्रण संचालक डॉ. पंकज चेडे यांनी या प्रकरणी तक्रार दिली.
 

इतर अॅग्रो विशेष
जल ‘अ’नीतीया वर्षी महापूर आणि दुष्काळ या दोन्ही समस्यांचा...
‘लष्करी अळी’बाबत सरकार उदासीनच!देशातील वीसपेक्षा जास्त राज्यांमध्ये आणि एक कोटी...
मराठवाड्यात २६ तालुक्‍यांत...औरंगाबाद  : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
दरकवाडीच्या दावणीला चाराप्रश्‍नाने...औरंगाबाद : आधी दुष्काळ मग खरिपातील चारा पिकांवर...
शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी राज्यात ...नागपूर : शेतकऱ्यांना पेरणी ते काढणीपर्यंत...
आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या जोरावर कडदे...पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील कडदे येथील...
कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा...पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्राच्या पश्‍...
विविधरंगी फुले, फीलर्सला गणेशोत्सवात...फुलांना वर्षभर मागणी राहते. मात्र, वर्षांतील काही...
एकरी सात टन भाताचे विक्रमी उत्पादनरत्नागिरी जिल्ह्यातील रीळ येथील मिलिंद वैद्य...
लष्करी अळीमुळे येतेय दूध व्यवसायावर संकटनगर ः मक्यावर आलेल्या अमेरिकन लष्करी अळीच्या...
मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी...परभणी: मराठवाडा वॉटर ग्रिडची अंमलबजावणी व्यापक...
शेतकऱ्यांमध्ये केलेल्या जनजागृतीतून...बुलडाणा  ः कृषी विभागाने लष्करी अळीच्या...
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत होणार...नाशिक: बाजार समितीचे कार्यक्षेत्र निफाड...
लष्करी अळीची शेतकऱ्यांमध्ये धास्तीरुईखेड मायंबा, जि. बुलडाणा ः ‘‘अमेरिकन लष्करी...
फवारणी केलेला मका चाऱ्यात वापरू नका:...पुणे (प्रतिनिधी)ः  राज्यात सध्या मक्यावर...
लष्करी अळीमुळे डेअरी, पोल्ट्रीला १३००...पुणे : राज्यातील डेअरी व पोल्ट्री उद्योगासाठी...
बाजार समित्यांतील रोख व्यवहारांवरील...नवी दिल्ली ः रोखीच्या व्यवहारांवर नियंत्रण आणून...
अन्नद्रव्यांचा वापर हवा संतुलितचशेतकऱ्यांनी माती आणि पाणी परिक्षणाबरोबरच...
मराठवाडा वॉटर ग्रिडचा संशयकल्लोळ! चिमणीचा खोपा ते राजवाडा, असे निवाऱ्याचे अनेक...
‘एफएमओ’चा सह्याद्री फार्म्सला १२०...नाशिक : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्वतःच्या...