agriculture news in marathi, Hudekeshwar, Narsala village Use the 'drone' to measure limit | Agrowon

हुडकेश्‍वर, नरसाळा गावाची हद्द मोजण्यासाठी ‘ड्रोन`चा वापर
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

नागपूर : पिकावरील फवारणीकामी ड्रोनचा वापर करण्यात आल्यानंतर आता गावाची हद्द मोजण्यासाठी, वाळू घाटांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच गावाची हद्द मोजणीसाठी नागपूर जिल्ह्यात ड्रोनचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नागपूर : पिकावरील फवारणीकामी ड्रोनचा वापर करण्यात आल्यानंतर आता गावाची हद्द मोजण्यासाठी, वाळू घाटांवर पाळत ठेवण्यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच गावाची हद्द मोजणीसाठी नागपूर जिल्ह्यात ड्रोनचा उपयोग केला जाणार असल्याची माहिती भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

हुडकेश्‍वर व नरसाळा ग्रामपंचायत नागपूर महानगरपालिका हद्दीत २०१३ मध्ये सामील करण्यात आली. हुडकेश्‍वर हनुमाननगर, तर नरसाळा ग्रामपंचायतचा भाग नेहरूनगर झोनमध्ये सामील करण्यात आला. ही दोन्ही गावे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतरही गावातील जमिनीची नोंद मात्र खसऱ्यावर (सातबाऱ्यावर) आहे. या गावाचा सिटी सर्व्हे करण्याची मागणी महानगरपालिकेने भूमिअभिलेख विभागाकडे केली होती. त्यानुसार या दोन्ही गावांची हद्द मोजण्यात येणार आहे. यासाठी ड्रोनचा उपयोग करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लिकेशन सेंटर यांच्या मदतीने ड्रोनचा उपयोग करून ही मोजणी होईल. धारकांनी जमिनीची हद्द दाखविण्यासाठी कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा भूमिअधीक्षक जी. बी. डाबेराव व उपअधीक्षक महेश राजगुरू यांनी केले आहे. 

तेलंगणामध्ये प्रयोग
गावाची हद्द मोजण्यासाठी किंवा रस्ते कामात ड्रोनचा वापर तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांनी यापूर्वीच केला आहे. आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीच्या कामातदेखील ड्रोनचा प्रभावी वापर केला गेल्याचे सूत्रांनी सांगितले. हैदराबाद येथील थॉनोस या ड्रोन उत्पादक कंपनीच्या पुढाकारातून नुकताच अकोल्यात पिकावर फवारणीकामी ड्रोनचा वापर केला गेला.

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...