पुण्यात फळे, भाजीपाल्याची प्रचंड आवक

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवार (ता.२५) पासून बंद ठेवण्याच्या शक्यतेने मंगळवारी (ता.२४) बाजार आवारात भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली
पुण्यात फळे, भाजीपाल्याची प्रचंड आवक
पुण्यात फळे, भाजीपाल्याची प्रचंड आवक

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवार (ता.२५) पासून बंद ठेवण्याच्या शक्यतेने मंगळवारी (ता.२४)  बाजार आवारात भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली. खरेदीसाठी घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणासाठी ग्राहकांना रांगेमध्ये बाजारात प्रवेश दिला जात होता.  दरम्यान १० वाजल्यानंतरही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाने जमावबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करत बाजार आवारात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू केली. भाजीपाला खरेदी झालेल्या ग्राहकांना आणि वाहनांना तातडीने बाहेर काढण्याची कारवाई सुरू केली होती.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस बाजार समिती बंद होती. यानंतर सोमवारी (ता.२३) बाजार समिती सुरू झाली. मात्र, रविवार (ता.२२) च्या जनता कर्फ्युमुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची तोड न केल्याने घाऊक बाजारात शेतमालाची आवक कमी राहिली. यानंतर बुधवार (ता.२५) पासून बाजार बंद ठेवण्याच्या अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांच्या भूमिकेमुळे मंगळवारी बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली.  दरम्यान, भाजीपाला खरेदीसाठी घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, पथारी आणि हातगाडी वरील विक्रेते आणि घरगुती ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणांसाठी ग्राहकांना रांगेमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र १० वाजल्यानंतरही गर्दी वाढल्याचे पाहून बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनासह १४४ कलमाच्या अंमलबजावणी करत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बाजार समितीमध्ये प्रवेश बंद केला. मात्र भाजीपाल्याची मोठ्याप्रमाणावर झालेली आवक आणि गर्दीवर आणलेल्या नियंत्रणामुळे दुपारपर्यंत ३० टक्के शेतमाल शिल्लक राहिला होता. या शेतमालाच्या विक्रीसाठी दिवसभराची परवानगी अडते असोसिएशनने बाजार समितीकडे मागितली, ती मंजूर करण्यात आली होती.   असे राहिले घाऊक दर (प्रति दहा किलो) :  फ्लॉवर, कोबी ३० ते ६०, भेंडी २००-३००, गवार ४०० ते ५००, टोमॅटो १४० ते १६०, काकडी ८० ते १२०, आले ५०० ते ५५०, हिरवी मिरची ५०० ते ६००, शेवगा २०० ते ३००, वांगी १०० ते २००, घेवडा, दोडका १५० ते २५०, ढोबळी मिरची २५० ते ३५०, तोंडली, कारली १५० ते २००, बीट ४० ते ५०  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com