agriculture news in marathi huge incoming of vegetable in Pune APMC | Page 2 ||| Agrowon

पुण्यात फळे, भाजीपाल्याची प्रचंड आवक

टीम अॅग्रोवन
बुधवार, 25 मार्च 2020

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवार (ता.२५) पासून बंद ठेवण्याच्या शक्यतेने मंगळवारी (ता.२४)  बाजार आवारात भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली

पुणे : कोरोना विषाणूचा फैलाव आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बुधवार (ता.२५) पासून बंद ठेवण्याच्या शक्यतेने मंगळवारी (ता.२४)  बाजार आवारात भाजीपाल्याची प्रचंड आवक झाली. खरेदीसाठी घाऊक विक्रेत्यांसह किरकोळ खरेदीदारांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणासाठी ग्राहकांना रांगेमध्ये बाजारात प्रवेश दिला जात होता. 

दरम्यान १० वाजल्यानंतरही गर्दी नियंत्रणात येत नसल्याने अखेर पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाने जमावबंदीच्या कायद्याची अंमलबजावणी सुरू करत बाजार आवारात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू केली. भाजीपाला खरेदी झालेल्या ग्राहकांना आणि वाहनांना तातडीने बाहेर काढण्याची कारवाई सुरू केली होती.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे सलग तीन दिवस बाजार समिती बंद होती. यानंतर सोमवारी (ता.२३) बाजार समिती सुरू झाली. मात्र, रविवार (ता.२२) च्या जनता कर्फ्युमुळे शेतकऱ्यांनी शेतमालाची तोड न केल्याने घाऊक बाजारात शेतमालाची आवक कमी राहिली. यानंतर बुधवार (ता.२५) पासून बाजार बंद ठेवण्याच्या अडते असोसिएशन आणि कामगार संघटनांच्या भूमिकेमुळे मंगळवारी बाजारात भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली. 

दरम्यान, भाजीपाला खरेदीसाठी घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, पथारी आणि हातगाडी वरील विक्रेते आणि घरगुती ग्राहकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणांसाठी ग्राहकांना रांगेमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र १० वाजल्यानंतरही गर्दी वाढल्याचे पाहून बाजार समिती प्रशासनाने पोलीस प्रशासनासह १४४ कलमाच्या अंमलबजावणी करत गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी बाजार समितीमध्ये प्रवेश बंद केला. मात्र भाजीपाल्याची मोठ्याप्रमाणावर झालेली आवक आणि गर्दीवर आणलेल्या नियंत्रणामुळे दुपारपर्यंत ३० टक्के शेतमाल शिल्लक राहिला होता. या शेतमालाच्या विक्रीसाठी दिवसभराची परवानगी अडते असोसिएशनने बाजार समितीकडे मागितली, ती मंजूर करण्यात आली होती.  

असे राहिले घाऊक दर (प्रति दहा किलो) : फ्लॉवर, कोबी ३० ते ६०, भेंडी २००-३००, गवार ४०० ते ५००, टोमॅटो १४० ते १६०, काकडी ८० ते १२०, आले ५०० ते ५५०, हिरवी मिरची ५०० ते ६००, शेवगा २०० ते ३००, वांगी १०० ते २००, घेवडा, दोडका १५० ते २५०, ढोबळी मिरची २५० ते ३५०, तोंडली, कारली १५० ते २००, बीट ४० ते ५०
 


इतर ताज्या घडामोडी
कळमना बाजार समितीत व्यवहार ठप्पनागपूर  ः कळमना बाजार समितीत धान्य...
नियंत्रण आंबा फळगळीचेसद्यःस्थितीमध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये...
बागेमध्येच उपलब्ध मण्यांपासून बेदाणे...तीन वर्षापूर्वी राष्ट्रीय द्राक्ष संशोधन...
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...