agriculture news in marathi huge losses to vegetable export due to air cargo service break | Agrowon

विमानसेवा बंदचा भाजीपाला निर्यातीला फटका

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने ही निर्यात ठप्प झाली असून निर्यातदार व संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कष्टाने पिकवलेल्या भेंडीला कमी दर मिळत असून प्लॉट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पुणे : फेब्रुवारी ते मे या काळात युरोपीय देशांकडून भारतीय भाजीपाल्याला मोठी मागणी असते. युरोपात कोरोनाचे संकट गडद असताना देखील ही मागणी चांगल्या प्रकारे होती. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केल्याने ही निर्यात ठप्प झाली असून निर्यातदार व संबंधित शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कष्टाने पिकवलेल्या भेंडीला कमी दर मिळत असून प्लॉट सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद केली आहे. साहजिकच युरोपात होणाऱ्या भारतीय भाजीपाला निर्यातीला त्याचा मोठा फटका बसला आहे. भाजीपाला निर्यात क्षेत्रातील आघाडीच्या केबी एक्सपोर्टस् कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सचिन यादव म्हणाले, की युरोपीय देशांत भाजीपाला निर्यातीसाठी फेब्रुवारी ते मे असा भारतासाठी सर्वात मोठा विंडो पिरीयड असतो. या काळात दरवर्षी आम्ही बेबी कॉर्न व भेंडी दररोज पाच ते सहा टन याप्रमाणात निर्यात करतो. मिरचीही असते. यंदा कोरोनाच्या संकटातही २० मार्चपर्यंत आमच्या शेतमालाला चांगली मागणी होती. किंबहुना दरवेळच्या तुलनेत एक ते दोन टनांनी मागणी वाढलेलीच होती. मात्र २० मार्चपासून ही बाजारपेठ आता बंद झाली आहे. त्यामुळे आमचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.    

यादव म्हणाले, की निर्यातीसाठी भेंडीला आम्ही २७ ते २८ रूपये दर शेतकऱ्यांना देऊ केला होता. आता याच भेंडीला स्थानिक बाजारपेठेत १२ रूपयांपेक्षाही कमी दर मिळत आहे. भेंडी काढणीचा खर्चच किलोला ८ ते ९ रूपये आहे. त्यामुळे भेंडीचे प्लॉट्स सोडून देण्याशिवाय या शेतकऱ्यांना पर्याय नाही. भारतातून निर्यात ठप्प झाल्याने केनिया, झांबियासारख्या देशांना युरोपात भाजीपाला निर्यातीचा मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

एकरी अडीच लाखांचे नुकसान
येळे म्हणाले, की मला दरवर्षी निर्यातक्षम भेंडी शेतीतून एकरी दोन ते अडीच लाख रूपये मिळतात. यंदा तेवढ्या रकमेचे नुकसान होणार आहे. दररोज १०० ते १५० किलो भेंडी उपलब्ध होत आहे. पण ती घेण्यासाठी कोणी तयार नाही. सुमारे एक टन भेंडी घरच्या जनावरांनाच खाऊ घातल्याचेही येळे यांनी सांगितले.


इतर अॅग्रोमनी
बिगर बासमती तांदळाच्या निर्यातवाढीसाठी...पुणे: तांदळाच्या जागतिक बाजारपेठेतील स्पर्धेत...
हिंगोलीत ई-नामअंतर्गत ६२२ क्विंटल हळद...हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
ब्राझीलच्या साखरेमुळे दर घसरलेकोल्हापूर : गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा...
साखर दरात सुधारणा कोल्हापूर ः देशात सुरू झालेली अनलॉकची प्रक्रिया व...
पुणे बाजार समितीचा पॅटर्न राज्यभर चर्चेतपुणे बाजार समितीमध्ये गेल्या काही वर्षांत अनेक...
आगामी हंगामावर शिल्लक साखरेचा दबाव कोल्हापूर: कोरोनामुळे यंदा देशात साखरेची विक्री...
साखर निर्यात अनुदानाचे साडेसात हजार...कोल्हापूर: गेल्या दोन वर्षात देशातील कारखान्यांनी...
देशातील साखर उद्योगही येईल पूर्वपदावर;...कोल्हापूर  : कोविडच्या संकटामुळे ठप्प झालेली...
साखर उत्पादनात उत्तर प्रदेशची झेपकोल्हापूर: यंदा उत्तर प्रदेशने साखर उत्पादनात...
ब्राझीलचे साखर उत्पादन भारताला अडचणी ?कोल्हापूर : यंदा ब्राझीलने इथेनॉलऐवजी साखर...
साखर विक्रीची मुदत १० जूनपर्यंत वाढवा...कोल्हापूर : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा)...
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
वस्त्रोद्योग येतोय पूर्वपदावरजळगाव ः लॉकडाउनमुळे ठप्प असलेला देशातील...
कापूस उत्पादनात २४ लाख गाठींनी घट शक्यजळगाव ः देशात कापसाच्या उत्पादनात सुमारे २४ लाख...
इंडोनेशियात साखर दरावरुन वातावरण तापले कोल्हापूर: लॉकडाऊनमुळे इंडोनेशियात साखर जात...
आत्मनिर्भर भारत योजनेला मंजुरी :...नवी दिल्ली : आत्मनिर्भर (स्वावलंबी) भारत योजनेत...
कीडनाशकांवर बंदीबाबत उद्योगातून तीव्र...पुणे : केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २७ रासायनिक...
काढणी-मळणी यंत्रांना मागणी वाढण्याची...पुणे: कोविड १९ साथीनंतर तयार झालेल्या आपत्कालिन...
देशातून ३६ लाख टन साखर निर्यात पुणे: देशातील साखर कारखान्यांनी निर्यातीसाठी...
धोरणं बदलल्यास खाद्यतेलात भारत...एके काळी दोन वेळच्या अन्नासाठी इतर देशांकडे हात...