अलोट गर्दीचा उच्चांक..; आज शेवटचा दिवस

‘सकाळ- अॅग्रोवन’ने मराठवाड्याच्या राजधानीत कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून शेतकऱ्यांना शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, शेतकरी करीत असलेले प्रयोग याचे दालन खुले करून दिले. अॅग्रोवनच्या या प्रयत्नाचे कौतुक आहे. - अर्जुन खोतकर, पशुसंवर्धन राज्यमंत्री,
कृषी प्रदर्शन
कृषी प्रदर्शन

औरंगाबाद ः येथील बीड बायपासजवळील जबिंदा मैदानावर सुरू असलेल्या ‘अॅग्रोवन’च्या कृषी प्रदर्शनात तिसऱ्या दिवशी राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांनी हजेरी लावून गर्दीचा उच्चांक मोडीत काढला. मराठवाड्यात अॅग्रोवनने भरविलेल्या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञान, यंत्र- अवजारे, ट्रॅक्टर, प्रक्रिया उद्योग, पशुव्यवस्थापन तंत्रज्ञान, शेतीविषयक दालनांवर माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची अलोट गर्दी झाली होती. रविवारी (ता. ३०) हे कृषी प्रदर्शन पाहण्याची शेवटची संधी राहणार आहे.  शनिवारी (ता. २९) सकाळपासूनच शेतकऱ्यांची या प्रदर्शनस्थळाकडे पावले वळू लागली होती. थेट नांदेड जिल्ह्याच्या शेवटच्या टोकापासून शेतकरी दाखल होत होते. औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, बीड, लातूर, हिंगोली, पुणे, नाशिक, नगर, जळगाव, बुलडाणा आदी जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने भेटी दिल्या. विविध शेतकरी गट, महिला बचत गटांचे सदस्य एकत्रितपणे प्रदर्शनाला दाखल झाले होते. अॅग्रोवनच्या कृषी प्रदर्शनाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नोंदणी कक्षात शेतकऱ्यांची चढाओढ चालली होती.    अॅग्रोवन कृषी प्रदर्शनचा ड्रोन व्हीव... video..

शनिवारी सकाळी पहिले चर्चासत्र ‘गटशेतीतून करूया दुष्काळावर मात’ या विषयावर झाले. डाॅ. बी. एम. कापसे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. दुसरे सत्र ‘पूरक उद्योगातून प्रगती’ या विषयावर झाले. यात श्रीधर सोलव, रवी राजपूत, लक्ष्मी खंडागळे यांनी उपस्थितांशी संवाद साधत शंकांचे समाधान केले. या दोन्ही परिसंवादांना चिकित्सक शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती. प्रदर्शनात शेतकरी, तसेच महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची दालने होती. शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या धान्य, फळांबाबत माहिती घेताना विविध भागांतील शेतकऱ्यांची उत्सुकता वाढलेली दिसून आली. अनेक ठिकाणी शेतकरी संबंधित दालनधारकांशी सविस्तरपणे चर्चा करीत दिसत होते. विविध प्रश्नोत्तरे तेथे सुरू असल्याचे बघायला मिळत होते. 

दुपारनंतर शेतकऱ्यांसह औरंगाबाद महानगरातील नागरिकांनीही कुटुंबीयांसह भेट दिली. याठिकाणी शहरी ग्राहकांनी महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी केली. सायंकाळच्या सुमारास ही गर्दी आणखी वाढत गेली. गेल्या तीन दिवसांत हजारो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन कृषी ज्ञान मिळवले, यंत्र- तंत्राबाबत जाणून घेतले. काही शेतकऱ्यांनी या प्रदर्शनात पेरणी यंत्र, मशागत यंत्र, तसेच ट्रॅक्टरचे अॅडव्हान्स बुकिंगही केले. 

आज समारोप सकाळ- अॅग्रोवनने आयोजित केलेल्या प्रदशर्नाचा रविवारी (ता. ३०) समारोप होणार आहे. गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांतून, तसेच विदर्भ, खानदेशातील शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली. प्रदर्शनात लावलेल्या विविध दालनांवर माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती. कृषी ज्ञानदानाचा हा यज्ञ रविवारी सायंकाळी संपणार आहे. शनिवारी (ता. २९) प्रदर्शनाला मोठी गर्दी झाली होती. अनेकांनी मराठवाड्यातील हे पहिले सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन असल्याच्या प्रतिक्रिया यानिमित्ताने व्यक्त केल्या. 

औरंगाबाद ः  अॅग्रोवन कृषी प्रदर्शनास राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी आवर्जून भेट दिली...

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com