agriculture news in Marathi human losses down due to accurate weather predictions Maharashtra | Agrowon

अचूक हवामान अंदाजामुळे जीवितहानीत घट : संशोधन अहवाल

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 मार्च 2021

गेल्या पन्नास वर्षांमध्ये देशात हवामान विभागाने तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक हवामानाचे अंदाज देण्यावर भर दिला आहे. देशभरात तिव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जिवितहानीमध्ये जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली आहे.

पुणे : गेल्या पन्नास वर्षांमध्ये देशात हवामान विभागाने तंत्रज्ञानाच्या आधारे अचूक हवामानाचे अंदाज देण्यावर भर दिला आहे. देशभरात तिव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जिवितहानीमध्ये जवळपास ४८ टक्क्यांनी घट झाली आहे. हवामान अंदाज आणि आपत्ती व्यवस्थापनात झालेल्या सुधारणांमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचले असल्याचा निष्कर्ष नुकत्याच झालेल्या संशोधनातून काढण्यात आला आहे. 

भारतात गेल्या पाच दशकांत हवामानाच्या तीव्र घटनांमुळे झालेल्या जीवितहानीच्या संशोधनाचा आढावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘वेदर अॅंड क्लायमेट एक्स्ट्रीम्स’ या जर्नलमध्ये घेण्यात आला आहे. यामध्ये महालनोबिस नॅशनल क्रॉप फोरकास्ट सेंटरचे एस.एस.रे, भूविज्ञान मंत्रालयाचे कमलजित रे, एम. राजीवन, भारतीय हवामान हवामानशास्त्र विभागाचे आर. के. गिरी आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे ए.पी. डिमरी या शास्त्रज्ञांचा या संशोधनात सहभाग आहे. 

संशोधनातील आकडेवारीनुसार १९७० ते २०१९ या कालावधीत देशभरात एकूण सात हजार ६३ हवामानाच्या तीव्र घटना नोंदविल्या गेल्या. यामध्ये अतिवृष्टी आणि पूर, चक्रीवादळे, उष्णतेची लाट, थंडीची लाट, विजा पडणे अशा घटनांचा समावेश होता. या घटनांमुळे पाच दशकांत देशभरात एकूण एक लाख ४१ हजार ३०८ व्यक्तींचा मृत्यू झाला. मात्र, १९७० ते १९९९ आणि २००० ते २०१९ या दोन दशकातील तुलना केल्यास पहिल्या दोन दशकांच्या तुलनेत नंतरच्या दोन दशकांत तीव्र हवामानाच्या घटनांत वाढ होऊनही जीवितहानी कमी झाल्याचे दिसून आले आहे. 

गेल्या दोन दशकांत आधीच्या दोन दशकांच्या तुलनेत तीव्र हवामानाच्या घटनांमुळे होणारी जीवितहानी ४८.६ टक्क्यांनी कमी झाली आहे. चक्रीवादळ आणि पूर यामुळे होणाऱ्या जीवितहानीत तब्बल ७५ टक्यांनी घट झाल्याचे संशोधनाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. अचूक हवामान अंदाज आणि त्याला अनुसरून स्थानिक पातळीवर वेळेत केलेल्या आपत्ती नियोजनामुळे हे शक्य झाले असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

याशिवाय राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर गेल्या दोन दशकांत उष्णतेची लाट आणि विजा पडून होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे संबंधित राज्यांनी परिस्थितीनुसार आपत्ती नियोजन करण्यावर अधिक भर देण्याची गरज असल्याचे माहितीही भारतीय हवामान हवामानशास्त्र विभागाचे आर. के. गिरी दिली. 

गेल्या १९७० ते २०१९ या काळातील जीवितहानीचे प्रमाण 

घटना घटना मृत्यू प्रमाण 
उष्णतेची लाट ७०६ १७३६२ १२.३ 
थंडीची लाट ५४६ ९.५९६ ६.८ 
पूर ३,१७५ ६५,१३० ४६.१ 
विजा पडणे २,५१७ ८,८६२ ६.३ 
चक्रीवादळे ११७ ४०,३५८ २८.६ 

घटनेनुसार सर्वाधिक प्रभावित झालेली पहिली पाच राज्ये : 
थंडीची लाट ः
बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, राजस्थान 
उष्णतेची लाट ः आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा 
पूर ः उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, उत्तरांखड, आंध्र प्रदेश, बिहार 
विजा पडणे ः महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, मध्य प्रदेश 
चक्रीवादळ ः ओडिशा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात तमिळनाडू 

प्रतिक्रिया
हवामानाच्या अचूक अंदाजामध्ये निश्चितच सुधारणा झाल्या आहेत. अचूक अंदाजामुळे जीवितहानीच्या नुकसानीची पातळी कमी झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने नव्याने यंत्रसामग्रीत वाढ करून तसेच नवीन प्रारूपे तयार करून हवामान अंदाजाची अचूकता वाढलेली आहे. 
- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानशास्त्रज्ञ, सदस्य, अॅग्रीकल्चर मेट्रोलॉजी फोरम फॉर साऊथ आशिया. 


इतर अॅग्रो विशेष
मॉन्सूनच्या प्रवाहाला पोषक स्थिती पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अरबी...
महिनाभरातच गाईच्या दूधदरात ८ रुपये कपात नगर ः कोरोना लॉकडाउनमुळे दुधाची मागणी कमी...
काबुली हरभऱ्याच्या दरात घसरणीची शक्यता...नवी दिल्ली ः देशात यंदा काबुली हरभऱ्याचे उत्पादन...
ग्राम कृषी विकास समित्या स्थापन करा :...पुणे ः कोरोना लॉकडाउनमुळे राज्याच्या खरीप...
पीकविम्यासाठी राज्यात बीड मॉडेल ः ...अमरावती : प्रशासकीय खर्च आणि दहा टक्के नफा अशी...
उसाचे गाव बेले रेशीम शेतीत चमकलेकोल्हापूर जिल्हयात बेले (ता. करवीर) या छोट्या...
अल्पभूधारकाचा शास्त्रीय दुग्ध...नाशिक जिल्ह्यातील कोळगाव (ता. निफाड) येथील...
एक लाख हेक्टरवर फळबागांचे उद्दिष्ट पुणे ः कोविड १९ च्या साथीची स्थिती राज्यभर असली...
‘महाडीबीटी’त आता बियाण्यांचाही समावेश पुणे : राज्य शासनाने महाडीबीटी पोर्टलमध्ये आता...
पूर्वमोसमीचा प्रभाव कमी होणार पुणे ः मध्य प्रदेशचा आग्नेय भाग आणि परिसरात ते...
तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पुणे : राज्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाचा...
हापूसच्या ४० हजार पेट्या थेट...रत्नागिरी ः उत्पादक शेतकरी ते थेट ग्राहक ही साखळी...
कडधान्य उत्पादनात ६५ टक्के वाढ पुणे ः देशातील कडधान्य उत्पादनात २००७-०८ पासून...
घरपोच चारा, दुग्धोत्पादन यातून अरोली...नागपूर जिल्ह्यातील अरोली गावातील पंचेचाळीस...
विदर्भात पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व कोकणच्या काही...
कृषी सेवा केंद्रचालक, कर्मचाऱ्यांना लस...पुणे ः राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांचे...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे...सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील...
खानदेशात केळीची कमी दरात खरेदी जळगाव ः खानदेशात नवती केळी बागांची काढणी सुरू...
निर्यातीच्या केळीला १३०० रुपये दर जळगाव ः खानदेशातून आखातात किंवा परदेशात केळी...
शेतीशाळांची ‘एसओपी’ निश्‍चित पुणे ः शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणाऱ्या शेतीशाळांसाठी...