agriculture news in Marathi hundreds ton watermelon in farm without selling Maharashtra | Agrowon

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेकडो टन कलिंगडे शेतातच पडून

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 मे 2021

कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील शेकडो कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. माल खरेदीसाठी व्यापारीच येत नसल्यामुळे शेतात शेकडो टन माल शिल्लक असून, तो सडण्याची प्रकिया देखील सुरू झाली आहे.

सिंधुदुर्गनगरी : कोरोना निर्बंधामुळे जिल्ह्यातील शेकडो कलिंगड उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. माल खरेदीसाठी व्यापारीच येत नसल्यामुळे शेतात शेकडो टन माल शिल्लक असून, तो सडण्याची प्रकिया देखील सुरू झाली आहे. त्यामुळे कलिंगड उत्पादक मोठ्या संकटात सापडले आहेत. 

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत कलिंगड लागवडीखालील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खरिपातील भात पिकाची कापणी झाल्यानंतर अनेक शेतकरी कलिंगड लागवड करतात. नोव्हेंबर ते मे अखेरपर्यंत कलिंगड उत्पादन घेतले जाते. एक एकरपासून दहा एकरांपर्यंत कलिंगड लागवड करणारे अनेक शेतकरी आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी कलिंगडे गोवा, बांदा येथील व्यापारी बांधावर येऊन खरेदी करतात. गोवा ही मोठी बाजारपेठ कलिंगडासाठी मानली जाते.

या वर्षी प्रतिकिलो १० ते १२ रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यामुळे चांगले उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली. शहरांप्रमाणे जिल्ह्यात देखील रुग्णांचे प्रमाण वाढू लागले. त्यातच ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला. 

दरम्यान, राज्य शासनाने वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध घातले. सध्या जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरू आहेत. या शिवाय बहुतांशी शहरातील नागरिकांनी आठ ते दहा दिवस पूर्णवेळ बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याचा मोठा परिणाम कलिंगड विक्रीवर झाला आहे. मोठ्या प्रमाणात कलिंगडांची खरेदी ही गोव्यातील व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर येऊन खरेदी करतात. परंतु माल खरेदी करून करायचे काय, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे एखादा अपवाद वगळता व्यापारी कलिंगड खरेदी करण्यास फारसे उत्सुक नाहीत. स्थानिक बाजारपेठा अकरा वाजेपर्यंत सुरू असल्यामुळे तेथूनही उत्पादकांना दिलासा मिळेल, अशी चिन्हे नाहीत. 

एप्रिल महिन्यात कलिंगडाला चांगला दर मिळतो. त्यामुळे या महिन्यात कलिंगड उत्पादन बाजारपेठेत येईल, असे नियोजन करून अनेक शेतकरी लागवड करतात. परंतु हे सर्व शेतकरी आता अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांच्या शेतात शेकडो टन माल सडत असल्याचे दिसत आहे. फळ विक्रीला शासनाची मान्यता आहे. परंतु बाजारपेठेत अकरानंतर ग्राहकच नसेल तर विक्री होणार कशी, असा प्रश्‍न उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे शेकडो कलिंगड उत्पादक आर्थिक अडचणीत आले आहेत. काही मोजके व्यापारी खरेदी करण्यासाठी येतात. परंतु ते देत असलेला दर हा अगदीच किरकोळ आहे. 
 
सलग दुसऱ्या वर्षी तोटा 
गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील कलिंगड उत्पादक आर्थिक संकटात सापडला होता. हजारो टन कलिंगड शेतातच कुजले होते. सलग दुसऱ्या वर्षी कलिंगडांची नासाडी होत असल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. 

प्रतिक्रिया
मी गडमठ (ता. वैभववाडी) येथे आठ एकर जागेवर कलिंगड शेती केली होती. पंधरा ते वीस दिवसांच्या फरकाने तीन टप्प्यांत लागवड करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यातील कलिंगडाची विक्री झाली. परंतु दुसऱ्या टप्प्यातील जवळपास ४० ते ४५ टन माल शेतातच सडला. या शिवाय आता तिसऱ्या टप्प्यातील माल १० ते १२ मेपर्यंत तयार होणार आहे. तो कसा विक्री करायचा, हा आमच्यासमोर प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
- दीपक कासोटे, कलिंगड उत्पादक शेतकरी, गडमठ 


इतर अॅग्रो विशेष
विदर्भात मुसळधारेची शक्यता पुणे : उत्तरेकडे मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...
दूधप्रश्‍नी शेतकरी आक्रमक; राज्यभरात...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
‘द्राक्ष क्लस्टर’मध्ये नाशिकचा समावेश नाशिक : केंद्र सरकारने देशभरात विविध ५३ पिकांचे...
सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजनेला गती...पुणे ः पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना...
कोकणसह कोल्हापुरात पावसाने दाणादाण पुणे : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड,...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विम्याचे...सोलापूर ः राज्यातील फळबागांसाठी असलेल्या...
सिंधुदुर्ग पूरस्थितीच्या उंबरठ्यावरसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार...
राज्यात कांदा प्रतिक्विंटल ५०० ते २३००...अकोल्यात प्रतिक्विंटल ६०० ते १६०० रुपये अकोला ः...
खानदेशातील आवार प्रगतीवर स्वारआवार (ता.जि. जळगाव) हे कापूस, दादर ज्वारीसाठी...
राज्यात २१८ तालुक्यांमध्ये दमदार पाऊस;...पुणे ः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील २१८...
राज्यात खरीप पेरणी तीन टक्केनगर ः राज्यात यंदा आतापर्यंत खरिपाची सरासरीच्या...
दूधप्रश्‍नी आज राज्यभर किसान सभेचे...नगर ः दुधाला दर मिळावा यासाठी गुरुवारी (ता. १७)...
विदर्भात पावसाचा जोर वाढणारपुणे : राज्यातील बहुतांशी भागात उन्हासह अंशतः...
अनेक वर्षांपासून जपली आले उत्पादकता अन्...आले पिकातील दरांत दरवर्षी चढउतार होते. मात्र...
भाजीपाला बीजोत्पादनातील ‘मास्टर’जिद्द, हिंमत, अभ्यास, ज्ञान घेण्याची वृत्ती व...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी...
पूर्वविदर्भात जोरदार पाऊस पुणे : राज्यातील काही भागांत पावसाचा दणका सुरूच...
जालन्यातील ऊस संशोधन केंद्र उभारणीला...पुणे ः ऊस शेतीच्या विकासासाठी विदर्भ,...
दूध दरांसाठी ग्रामसभांच्या ठरावाची...नगर : राज्यात दुधाला दर दिला जात नसल्याने दूध...
आता शेतकरीच करणार पीकपाहणी पुणे ः तलाठ्याकडून गावशिवारात प्रत्यक्ष पाहणी...