Agriculture news in marathi hungry Students learning in schools in Jalgaon district | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात गिरवताहेत उपाशीपोटी धडे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार बंद झाल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शासन आणि पुरवठादार यांच्यातील करार संपुष्टात आल्याने पुरवठादारांकडून धान्य, अन्य मालाचा पुरवठा करणे बंद करण्यात आले आहे. परिणामी, शाळांत पोषण आहार शिजत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत आहार घेण्याची सवय लागली असल्याने आता उपाशीपोटी त्यांना वर्गात बसावे लागत असल्याची स्थिती आहे.

जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणारा पोषण आहार बंद झाल्याची स्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. शासन आणि पुरवठादार यांच्यातील करार संपुष्टात आल्याने पुरवठादारांकडून धान्य, अन्य मालाचा पुरवठा करणे बंद करण्यात आले आहे. परिणामी, शाळांत पोषण आहार शिजत नाही. विद्यार्थ्यांना शाळेत आहार घेण्याची सवय लागली असल्याने आता उपाशीपोटी त्यांना वर्गात बसावे लागत असल्याची स्थिती आहे.

शालेय पोषण आहारातील धान्य, मालाचा पुरवठा करण्यासाठी गुणिना कमर्शिअल प्रा. लि. कंपनीस ठेका देण्यात आला होता. महाराष्ट्र शासनातर्फे गेल्या वर्षी त्यासाठी करार करण्यात आला होता. हा करार १४ फेब्रुवारीपासून संपुष्टात आला आहे. त्यामुळे शाळांना तांदूळ वगळता होणारा धान्याचा पुरवठा थांबविण्यात आला आहे. ज्या शाळेत माल शिल्लक आहे, तेथे आहार पुरवठा सुरू आहे. मात्र ज्या ठिकाणी माल संपला आहे, तेथील आहार बंद करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. 

शासनाने दखल घेऊन तातडीने पुरवठादार नेमून आहार पुरवठा करावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती पोपट भोळे यांनी केली. जिल्ह्यातील शिक्षकांकडून यासंदर्भात तक्रारी आल्या आहेत. पोषण आहार पुरवठा बंद झाल्याची तक्रार केल्याचे पोपट भोळे यांनी सांगितले. 

 स्थानिक स्तरावर माल खरेदी करा

पोषण आहारासाठी आवश्‍यक साहित्याचा पुरवठा थांबल्याने शाळांकडील शिल्लक माल संपला आहे. शासनाने नवीन पुरवठादाराशी करार होईपर्यंत स्थानिक स्तरावर माल खरेदीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भोळे यांनी केली. अद्यापही अनेक शाळांकडे माल शिल्लक आहेत, त्यांनी तो इतर शाळांना द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...