तासगाव तालुक्‍यात चाऱ्याची शोधाशोध

आतापर्यंत केवळ एका ग्रामपंचायतीकडून चारा छावणी सुरू करण्याच्या मागणीचा ग्रामसभेचा ठराव आला आहे. तासगाव तालुक्‍यात चारा उपलब्ध असल्याचा अहवाल कृषी विभागाने दिल्याचे समजते. - कल्पना ढवळे, तहसीलदार दुष्काळाच्या झळा तीव्र आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे बाजार समितीतर्फे काही ठिकाणी चारा छावण्या सुरू करण्यात येतील. - ॲड. जयसिंग जमदाडे,सभापती, बाजार समिती
तासगाव तालुक्‍यात चाऱ्याची शोधाशोध
तासगाव तालुक्‍यात चाऱ्याची शोधाशोध

तासगाव, जि. सांगली : तासगाव तालुक्‍यात मे महिन्यात पुरेल एवढा चारा शिल्लक आहे, असा जावईशोध कृषी विभागाने लावला आहे. साहजिकच त्यामुळे तालुक्‍यात चारा छावणी सुरू होण्याची शक्‍यता मावळल्यात जमा आहे. गवोगावी शेतकरी, पशुपालकांकडून चाऱ्याची शोधाशोध सुरू आहे. तालुक्याच्या पूर्व भागात पाणी, चाऱ्याचे दुर्भिक्ष आहे. 

तासगाव तालुका या वर्षी पुन्हा भीषण दुष्काळात होरपळत आहे. सुदैवाने म्हैसाळ, ताकारी, टेंभू, विसापूर-पुणदी, आरफळ या योजनांतून पाणी सोडल्याने थोडा दिलासा मिळाला. परंतु पूर्व भागात पाणी, चाऱ्याचे दुर्भिक्ष आहे. त्यात कृषी विभागाने मंडल निहाय मे महिनाअखेर पुरेल इतका चारा उपलब्ध असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे चारा छावणी सुरू करण्याच्या प्रस्तावाची गोची झाली आहे. 

तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. डोंगरसोनी येथे बाजार समितीतर्फे चारा छावणी सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. डोंगरसोनी ग्रामपंचायतीने ग्रामसभेचा ठराव करून चारा छावणी मागणी केली आहे.

महसूल प्रशासनाने बैठकही बोलावली होती. डोंगरसोनी या एकाच गावातून ग्रामपंचायतीकडून मागणी आली. सर्वपक्षीय मोर्चाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात तालुक्‍यात १० गावांत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com