Agriculture news in marathi Hurricane damage Demand for compensation to those who have died | Page 3 ||| Agrowon

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरपाईची मागणी 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 15 जून 2021

या हंगामाला सुरुवात होताच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडाळी देशमुख परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळ व मुसळधार पावसाने केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले.

वडाळी जि. अकोला : या हंगामाला सुरुवात होताच वादळामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. अकोट तालुक्यात दोन दिवसांपूर्वी वडाळी देशमुख परिसरातील गावांमध्ये चक्रीवादळ व मुसळधार पावसाने केळी व इतर फळबागांचे मोठे नुकसान झाले. वादळामुळे मोठमोठी झाडे उन्मळून पडली व विजेच्या ताराही तुटून पडल्या. 

वडाळी देशमुख गावामधील पणज मुख्य मार्गावर सरपंच प्रवीण शिंगाडे यांच्या घराजवळील वडाचे जुने झाड पडले. झाडाखाली सोपान डवाले यांच्या दोन गाड्या होत्या, त्यांचे नुकसान झाले. कांद्यांचे भरलेले कट्टे गारीमुळे खराब झाले. गौरव सुभाष वैतकार यांच्या गोठ्यावरील टीन पत्रे उडाले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य जगत गणेश वाहुरवाघ, संजय रामदास वाहुरवाघ, बाळाराम अर्जुन भाटे, प्रमिला देवराव आग्रे, निर्मला रामकृष्ण वारुळे, या मजूर वर्गाच्या राहत्या घरावरील टीन पत्रे उडून गेली. काहींचे घरांच्या मुख्य भिंती पडल्या आहेत. प्रशासनाने वडाळी देशमुख परिसरामधील फळबाग, शेतकरी व गावामधील मजुरांच्या घराचे नुकसानासाठी तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच प्रवीण शिंगाडे यांनी केली.


इतर बातम्या
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
बुलडाण्यात ८९ हजार हेक्टर बाधितबुलडाणा : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात तीन दिवस...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
जतमध्ये यंदा मुबलक पाणीसाठा सांगली : जत तालुक्यात २७ प्रकल्प असून, २५३७.८२...
बटाटा वाणाचे भाव तेजीत मंचर, जि. पुणे : बाजार समितीच्या आवारात मराठवाडा...
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत साडेतीन लाख...नांदेड : जिल्ह्यात आगामी रब्बी हंगामात पेरणी...
एफआरपीपेक्षा  जादा दर मिळणार?कोल्हापूर : प्रति वर्षीप्रमाणे यंदाही स्वाभिमानी...
नांदेड जिल्ह्यातील वीस हजार शेतकरी...नांदेड : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जिरायत, बागायत जमीन विक्रीवरील निर्बंध ...नाशिक : ‘‘शासनाच्या नव्या धोरणानुसार जमीन...
चंदन लागवडीला प्रोत्साहन; अगरबत्ती...मुंबई : चंदन लागवडीला प्रोत्साहन देणे तसेच...
धुळे : अमरिश पटेल यांचा बिनविरोधसाठी... धुळे : बहुचर्चित धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती...
परभणी जिल्ह्यात कापसाला किमान सात हजार...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील खासगी कापूस...
खानदेशात रब्बीची पेरणी २०० टक्के होणे...जळगाव ः खानदेशात रब्बी पेरणीची तयारी सुरू झाली...
‘महावितरण’ची थकबाकी वसुली अत्यावश्यक :...नाशिक : ‘‘वीजनिर्मिती कंपन्यांकडून वीज विकत घेऊन...
परराज्यांतील भात रोखा : मंत्री छगन भुजबळ गडचिरोली :  परराज्यांतील भात (धान) चोरट्या...