ओटवणे परिसराला वादळाचा तडाखा

ओटवणे परिसराला वादळाचा तडाखा
ओटवणे परिसराला वादळाचा तडाखा

सिंधुदुर्ग ः ओटवणे (ता. सांवतवाडी) परिसराला वादळाचा तडाखा बसला. यामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे, तर जिल्ह्यात सर्वत्र पडत असलेल्या पावसामुळे भातशेती आडवी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे परिपक्व झालेली भातशेती कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे.

जिल्ह्यात ओटवणे परिसराला वादळाचा तडाखा बसला आहे. यामध्ये ओटवणे गावातील एका घरांचे नुकसान झाले. तर वादळांमुळे गावातील भातशेती आडवी झाली. यामध्ये भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. 

दरम्यान जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतीचे नुकसान होत आहे. मोठ्या प्रमाणात भातपीके पक्व झाले आहे. काही शेतकऱ्यांनी भातकापणीस सुरवात देखील केली आहे. मात्र, पावसामुळे कापणीत व्यत्यय येत आहे. पावसामुळे परिपक्व झालेले भातपीके आडवी होताना दिसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान आज सकाळपासून पुन्हा विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आहे. पावसाने वैभववाडी, खारेपाटण, भुईबावडा, फोंडाघाट परिसराला झोडपून काढले. या पावसामुळे भातपिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com