Agriculture news in marathi 'I am delighted to give vegetables for Saheb' | Agrowon

...त्याने आपल्या शेतातील भाजी दिली थेट पवारांना !

संपत मोरे
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील सुक्रे या शेतकरी तरुणाने केंदूर ते मुंबई असा मोटरसायकलने प्रवास करत आपल्या शेतातील भाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर नेऊन दिली. साहेबांना भाजी पोच केल्यावर मला खूप आनंद वाटत असल्याचे सुनील म्हणाले. 

पुणे : शिरूर तालुक्यातील केंदूर येथील सुनील सुक्रे या शेतकरी तरुणाने केंदूर ते मुंबई असा मोटरसायकलने प्रवास करत आपल्या शेतातील भाजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर नेऊन दिली. साहेबांना भाजी पोच केल्यावर मला खूप आनंद वाटत असल्याचे सुनील म्हणाले. 

मुंबईपासून २०० किलोमीटर असलेल्या केंदूरवरून दुचाकीने प्रवास करून या शेतकऱ्याने पवार यांच्या घरी शुक्रवारी (ता. २२) भाजीपाला पोच केला. या घटनेबाबत पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये ‘‘सुनील सुक्रे या शिरूर तालुक्यातील केंदूर गावच्या शेतकऱ्याने २०० किलोमीटर दुचाकीने प्रवास करून मला मुंबईत भाजीपाला आणून दिला. अशा काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रेम हीच माझी शक्ती आहे,’’ असे म्हटले आहे.

सुनील म्हणाले, ‘‘शरद पवार हे आम्हा शेतकऱ्यांचे आधारवड आहेत. शेतकऱ्यांवर कसलीही वेळ आली, तर ते आधार द्यायला येतात. अशा नेत्याला माझ्या शेतातील भाजी द्यावी अशी इच्छा होती. मी आज सकाळी पहाटे गावातून मुंबईला गेलो. साहेबांना भाजी पोच केल्यावर मला खूप समाधान वाटत आहे.’’


इतर ताज्या घडामोडी
खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...जळगाव : खानदेशात कांदेबाग केळी लागवडीची तयारी...
औरंगाबाद, जालना, परभणीत बहुतांश मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी या तीनही...
नाशिक बाजार समितीतील कर्मचारी...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोलापूर जिल्हा परिषदेत सेसफंड, करनिधी...सोलापूर  ः कोरोनामुळे कधी नव्हे, ती सहा-सात...
नगर जिल्ह्यात शेततळ्यांच्या कामांची...नगर ः दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याच्या पाण्यावर...
पूर्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा...हिंगोली  ः ‘‘जिल्ह्यातील पूर्णा नदीवरील...
वाखारी येथे शेतकरी, शेतमजुरांना कौशल्य...पुणे ः कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १४२...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १४२...
दहिवडीत शेतीकामांच्या मजुरीदरांसह...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतीव्यवस्था...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात दीड लाख...औरंगाबाद  : दोन जिल्ह्यांतील साडेचार हजारावर...
उजनीची पाणीपातळी २८ टक्केवर सोलापूर  ः पुणे जिल्ह्यातील पावसाच्या...
वरखेडीतील पशुधनाचा बाजार उद्यापासून...पाचोरा, जि.जळगाव  ः वरखेडी (ता.पाचोरा) येथील...
जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांवर लिंबं...भडगाव, जि.जळगाव  ः जिल्ह्यात लिंबू पिकासाठी...
कृषी महाविद्यालयाच्या जागेचा प्रश्न...भंडारा : कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित...
परभणी जिल्ह्यात कपाशी बियाण्याच्या साडे...परभणी : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात विविध...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७०...वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग ः ऑगस्ट महिन्यात मुदत...
चंद्रपूर जिल्ह्यात कापूस कोंडीत भर...चंद्रपूर : येत्या  हंगामातील कापूस खरेदीसाठी...
पंधरा शेतकऱ्यांच्या सौरकृषी पंपात...चंद्रपूर : मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत...
जलालखेडा येथील दीडशे शेतकरी...नागपूर : खरीप कर्जाचे वाटप शनिवार (ता. १५) पर्यंत...
सांगली जिल्ह्यात डाळिंब संकटांच्या...सांगली ः वातावरणातील बदलाने डाळिंबावर तेलकट डाग...