Agriculture news in Marathi I will join BJP if I buy agricultural commodities with guarantee: Bachchu Kadu | Agrowon

हमीभावाने शेतीमाल खरेदी केल्यास भाजपमध्ये जाईन ः बच्चू कडू

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020

केंद्र सरकारने शेतीमालाचा ५० टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी कायद्यांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन, असा उपरोधिक टोला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला लगावला.

नगर ः केंद्र सरकारने शेतीमालाचा ५० टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी कायद्यांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन, असा उपरोधिक टोला जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केंद्र सरकारला लगावला. बिहार निवडणुकीचा महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही, असे ही त्यांना स्पष्ट केले.

नगर येथे जलसंपदा कार्यालयात दिव्यांगांसाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन मंत्री कडू यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

श्री. कडू म्हणाले, की केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा राज्य सरकारने नाकारला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात कोणताही कायदा करताना, आमच्या संघटनेने शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या दोन मागण्या त्यात घ्याव्यात. शेतीमालाचा ५० टक्‍के नफा गृहीत धरून हमीभाव द्यावा. हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, अशी मागणी होती आणि आहे. मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. जर केंद्र सरकारने हमीभावानुसार सरकारनेच शेतीमाल खरेदी करावा, असा बदल केंद्र सरकारने त्यांच्या कृषी विधेयकांत केला, तर मी भाजपमध्ये जाईन, त्यांची सेवा करीन, बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जेवढी वातावरणनिर्मिती केली, त्या प्रमाणात त्यांना विजय मिळाला नाही. या निवडणूक निकालाचे महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही पडसाद उमटणार नाहीत. राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे. राजकारणात चढ-उतार सुरूच असतात. बिहार निवडणुकीत त्याचा अनुभव आल्याचे मंत्री कडू यांनी सांगितले.

 


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...