Agriculture news in marathi ICAR tests cashew crop cultivation | Agrowon

गडचिरोली : 'आयसीएआर'ची काजू पीक लागवडीची चाचपणी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020

गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात आर्थिक समृद्धी यावी याकरिता अपारंपरिक पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) घेतला आहे. त्या अंतर्गत काजू लागवडीची चाचपणी या भागात केली जात असून त्या पार्श्‍वभूमीवर अकोला कृषी विद्यापीठाच्या पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक काजू क्षेत्र असलेल्या रोपवाटिकांची पाहणी केली. 

गडचिरोली  ः भात उत्पादक पूर्व विदर्भात आर्थिक समृद्धी यावी याकरिता अपारंपरिक पिकाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) घेतला आहे. त्या अंतर्गत काजू लागवडीची चाचपणी या भागात केली जात असून त्या पार्श्‍वभूमीवर अकोला कृषी विद्यापीठाच्या पथकाने गडचिरोली जिल्ह्यातील पारंपरिक काजू क्षेत्र असलेल्या रोपवाटिकांची पाहणी केली. 

पूर्व विदर्भातील अमरावती नागपूर जिल्ह्यात संत्रा हे फळपीक होते. राज्यातील सरासरी दीड लाख हेक्‍टर क्षेत्रापैकी सुमारे एक लाख हेक्‍टर क्षेत्र नागपुरी संत्र्याखाली विदर्भात आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात धाना(भाता)खालील सर्वाधिक क्षेत्र आहे. परंतू अनेक कारणांमुळे धान पिकाची अपेक्षित उत्पादकता मिळत नसल्याने या भागातील शेतकऱ्यांचे जीवनमान बदलले नाही. त्या पार्श्‍वभूमीवर नवीन पिकांचा पर्याय शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद अंतर्गत असलेल्या गोव्यातील कोस्टल रिसर्च सेंटरच्या वतीने देशातील विविध भागासाठी पर्यायी पीक कार्यशाळा भरविण्यात आली. त्यामध्ये पूर्व विदर्भात काजू लागवड शक्‍य असल्याचा दावा करण्यात आला.

या कार्यशाळेला डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, फळपीकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशांक भराड उपस्थित होते. कार्यशाळेरून परतल्यावर त्यांनी गडचिरोलीतील वाकोडी येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेला भेट दिली. या ठिकाणी ३५० काजूची झाडे असून ती १० वर्ष जुनी आहेत. काजूची झाडे चांगल्या स्थितीत असल्याने या भागातील वातावरण पोषक असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला. केव्हीकेचे डॉ. संदीप कऱ्हाळे, सह्योगी अधिष्ठाता डॉ. एस. बी. अमरशेट्टीवार, डॉ. शालिनी बडगे, सहायक गीता कुळमेथे आदी या वेळी उपस्थित होते.  भारतीय कृषी संशोधन परिषद तसेच दापोली कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ या भागाचा दौरा करणार आहेत.

विद्यापीठ करणार संशोधन
पूर्व विदर्भात काजू लागवड शक्‍य असली तरी वातावरणातील बदलामुळे होणारी फळगळ नियंत्रणाचे आव्हान पहिल्या टप्प्यात तज्ज्ञांसमोर असणार आहे. वेंगुर्ला ४ व ६ हे काजू वाण आहेत. परंतू या भागासाठी कमी कालावधीत परिपक्‍व होणारे वाण देणे. तापमान वाढते त्यामुळे फळगळीची शक्‍यता, १४ ते १५ अंश सेल्सीअस तापमान राहावे याकरिता मायक्रो क्‍लायमेटची निर्मिती करावी लागणार आहे. त्या माध्यमातून पाणी, आर्दता आणि तापमान नियंत्रीत ठेवावे लागेल. जागेवर खुंटाची वाढ करून त्यावर कलम बांधावी लागेल, त्या दृष्टीने तज्ज्ञांकडून चाचपणी करण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...
पीकविम्याची रक्कम कर्जखात्यांत जमा करू...अकोला : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर बँकांनी खरीप...
मोफत धान्य देण्यासंदर्भात केंद्राचे...मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सध्या...
‘जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांत ‘सोशल...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील...
आठवड्याचा अंदाज : ढगाळ हवामानासह...महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतके...
आरोग्यदायी लसूणआपल्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक म्हणजेच लसूण...