पाळेकर पॅटर्नच्या दाव्याचा आयसीएआर करणार अभ्यास

या समितीचे काम प्राथमिक टप्प्यात असल्याने तूर्तास या विषयावर अधिक भाष्य करणे संयुक्‍तिक होणार नाही. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या निर्देशानुसार कामकाज व अभ्यासाची दिशा ठरवून समिती आपला अहवाल देईल. - डॉ. व्ही. प्रवीण राव, कुलगुरू, प्रोफेसर जयशंकर तेलंगण स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी, हैदराबाद
पाळेकर पॅटर्नच्या दाव्याचा आयसीएआर करणार अभ्यास
पाळेकर पॅटर्नच्या दाव्याचा आयसीएआर करणार अभ्यास

अमरावती ः अवघ्या एका देशी गाईच्या माध्यमातून ३० एकर शेती शक्‍य असल्याचा दावा करणाऱ्या सुभाष पाळेकर यांच्या नैसर्गिक तंत्रज्ञानाची तांत्रिक बाजू आता अभ्यासली जाणार आहे. खुद्द भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) त्यासाठी पुढाकार घेतला असून, तब्बल बारा सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे.  अमरावती जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या सुभाष पाळेकर यांनी झिरो बजेट नैसर्गिक शेती नावाचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले होते. एका देशी गाईच्या माध्यमातून ३० एकर शेती शक्‍य असल्याचा दावा याद्वारे करण्यात आला. महाराष्ट्राच्या काही भागाचा अपवाद वगळता हे तंत्रज्ञान स्वीकारले गेले. परंतु तेलंगण, आंध्र प्रदेश, आसाम यांसह सहा राज्यांमध्ये लाखो शेतकरी या तंत्रज्ञानाशी जुळले गेले आहेत. या राज्यांत होणाऱ्या पाळेकर यांच्या शिबिरालादेखील मोठी गर्दी राहते.  सुभाष पाळेकर तंत्रज्ञानाला काही शेतकऱ्यांकडून समर्थन, तर काहींचा विरोध हा नेहमीचा प्रकार झाला आहे. त्याची दखल घेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने या तंत्रज्ञानाचे दावे-प्रतिदावे तपासण्यासाठी आपल्या स्तरावर एका समितीची स्थापना केली आहे.  देशात खासगी तंत्रज्ञानाची सत्यता पडताळण्यासाठी पहिल्यांदाच आयसीएआरकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. या शेतीपद्धतीच्या तथ्यावर आधारित प्रमाणीकरण आणि पद्धतीमधील त्रुटींचा अभ्यास ही समिती करणार आहे. हैदराबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगण स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. व्ही. प्रवीण राव हे या समितीचे अध्यक्ष, तर डॉ. एन. रविशंकर हे समिती सचिव आहेत. या दोघांसह समितीमध्ये बारा सदस्य आहेत.  म्हणून आयसीएआरने घेतला पुढाकार हरियानाच्या कुरुक्षेत्र भागात काही क्षेत्रावर पाळेकर पॅटर्ननुसार शेती होते. हे मॉडेल पाहण्यासाठी हिमाचलचे राज्यपाल आचार्य देव यांच्यासह भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा, देशातील १० कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, १५० शास्त्रज्ञ गेले होते. त्यानंतर निती आयोगाच्या बैठकीतदेखील या पॅटर्नवर चर्चा झाली. त्यानंतर पाळेकर यांच्या दाव्यातील तथ्य तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रतिनिधी

आमचे मॉडेल उभे असून त्यात वाढ होत आहे, त्यामुळे कृषी संशोधन परिषदेने प्रमाणित केले किंवा नाही त्याचा कोणताच फरक आमच्या तंत्रज्ञानावर होणार नाही. आमची ही चळवळ थांबणार नाही. त्यांना लागणारे सर्व प्रकारचे सहकार्य आम्ही करू. सहा राज्यांनी हे तंत्रज्ञान स्वीकारले असून, लाखो शेतकरी एका राज्यात या चळवळीशी जुळलेले आहेत. - सुभाष पाळेकर,  नैसर्गिक शेतीतज्ज्ञ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com