agriculture news in marathi ICAR's awards announced, AGROWONs Gadre, Ingole winner | Agrowon

'आयसीएआर'चे पुरस्कार जाहीर; 'अॅग्रोवन'चे गद्रे, इंगोलेंसह डॉ. मार्केंडेय यांचा समावेश

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 16 जुलै 2020

भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) २०१९ चे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील कृषी संशोधक, शास्त्रज्ञ, शेतकरी, पत्रकार यांचा या सहभाग आहे.

पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (आयसीएआर) २०१९ चे प्रतिष्ठेचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत. सकाळ अॅग्रोवनचे नागपुरचे वार्ताहर विनोद इंगोले यांना एक लाखाचा; तर ‘अग्रोवन'चे मुख्य उपसंपादक अमित गद्रे व लेखक प्राचार्य डॉ.नितीन मार्कंडेय यांना संयुक्तपणे एक लाखाचा पुरस्कार मिळाला आहे.

'आयसीएआर'चा ९२ व्या स्थापनादिन सोहळा आज (ता.१६) नवी दिल्ली येथे संपन्न झाला. यावेळी देशातील कृषी संशोधक, शास्त्रज्ञ, शेतकरी, पत्रकार यांच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, राज्यमंत्री पुरूषोत्तम रुपाला व कैलाष चौधरी, 'आयसीएआर'चे महासंचालक डॉ.त्रिलोचन महापात्रा, केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल उपस्थित होते.

'आयसीएआर'कडून कृषी संशोधन व विकासात्मक कृषी पत्रकारितेसाठी दिला जाणारा २०१९ चा 'चौधरी चरण सिंग पुरस्कार' विनोद इंगोले यांना जाहीर करण्यात आला. अमित गद्रे व परभणी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नितीन मार्केंडेय संपादित ‘देशी गोवंश’पुस्तकाला 'डॉ. राजेंद्र प्रसाद पुरस्कार` मिळाला आहे. कृषी व संलग्न विषयांमधील तांत्रिक माहिती देणाऱ्या हिंदी पुस्तकासाठी हा पुरस्कार दिला जातो.

'अॅग्रोवन'ने देश आणि राज्यातील देशी गोवंशाचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन या विषयावर एक विशेषांक प्रसिद्ध केला होता. यामध्ये जातिवंत दुधाळ देशी गोवंशाचे संगोपन आणि संवर्धन , खाद्य व आरोग्य व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग आणि शास्त्रीय पद्धतीने गोशाळा व्यवस्थापन अशी विविधांगी माहिती देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी या विशेषांकाचे जोरदार स्वागत केले होते. याच विशेषांकात आणखी नव्या विषयांचा अंतर्भाव करून सकाळ प्रकाशनाकडून मराठी भाषेत समग्र माहिती देणारे ‘देशी गोवंश’ पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते.
भारतीय गोवंशाची शास्त्रीय माहिती देणाऱ्या या पुस्तकाच्या पाच मराठी आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. सकाळ कार्यालय तसेच सकाळ पब्लिकेशन वेबसाईट आणि'अॅमेझॉन'वर पुस्तकाची मराठी व हिंदी आवृत्ती उपलब्ध आहे. याच पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'आयसीएआर'चा पुरस्कार जाहीर होताच हे पुस्तक पुन्हा चर्चेत आले आहे.

'अॅग्रोवन' परिवारातील प्रयोगशील महिला शेतकरी विद्याताई बाबूराव रुद्राक्ष यांना देखील 'आयसीएआर'चा पुरस्कार घोषित झाला आहे. डिघोळअंबा (जि.बीड) गावात एकात्मिक शेतीविकासाचे अनोखे मॉडेल उभे करणाऱ्या विद्याताईंना 'अॅग्रोवन स्मार्ट महिला शेतकरी अॅवॉर्ड' देत 'अॅग्रोवन'ने २०१६ मध्ये गौरविले होते.

तसेच, 'आयसीएआर'ने 'पंडीत दीनदयाल उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्कारा'साठी बारामती फार्मर्स प्रोडयुसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद वरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. ते प्रयोगशील शेतकरी असून महाऑर्गेनिक अॅन्ड रेसिड्यू फ्री फार्मर्स असोसिएशनचे (मोर्फा) देखील प्रतिनिधी आहेत. 

देशात उत्तम कार्य करणाऱ्या १४ कृषी विज्ञान केंद्रांना 'आयसीएआर'चे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये अंबाजोगाई येथील ‘केव्हीके‘चा समावेश आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. "देशाच्या कृषी क्षेत्राला आकार देण्यात या संस्था व व्यक्तींचे योगदान मोलाचे आहे," असे कृषिमंत्र्यांनी नमूद केले. 

'देशी गोवंश’ पुस्तक ऑनलाईन उपलब्ध असून खरेदीसाठी पुढील लिंकला क्लिक करा.. 
www.sakalpublications.com /amazon.in


इतर बातम्या
खानदेशात तिसऱ्या दिवशीही रिमझिम सुरूचजळगाव : खानदेशात मागील तीन दिवस सतत रिमझिम सुरू...
सोलापूर जिल्ह्यात भिज पाऊस, जोर नाहीचसोलापूर  ः गेल्या अनेक दिवसांपासूनच्या...
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढपुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी...
पुणे जिल्ह्याच्या धरणक्षेत्रात पावसाची...पुणे ः पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा...
राज्यात आज आणि उद्या पाऊस जोर धरणारपुणे :  गेल्या तीन ते चार दिवसापासून...
वऱ्हाडात पावसाची संततधार सुरूअकोला ः मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडात पाऊस...
नागपूर जिल्ह्यात मोठा आणि तान्हा पोळा...नागपूर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे...
पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना... पुणे : ‘पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना...
औरंगाबाद जिल्ह्यात शेतकऱ्यांना ८५००...औरंगाबाद :  जिल्ह्यातील ९६३ शेतकऱ्यांकडून...
मराठवाड्यात सुमारे ४७ लाख हेक्टरवर खरीपऔरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाचे सर्वसाधारण...
गाव करतेय गवतांचे संवर्धन शाश्वत प्रगतीच्या मार्गावर निघालेले...
खानदेशात तीन दिवसांपासून भिज पाऊसजळगाव  ः खानदेशात मागील तीन दिवसांपासून भिज...
अमळनेरमध्ये रासायनिक खतांचा वापर वाढलावावडे, जि. जळगाव  : अमळनेर तालुक्यात जवळपास...
खडकवासलातून ११ हजार ७३५ क्युसेक विसर्गपुणे : खडकवासला धरणातून बुधवार (ता. १२) पासून...
सातपुड्यात मूगाच्या नुकसानीची शक्यताजळगाव  ः खानदेशात सातपुडा पर्वत भागात पाऊस...
गडचिरोलीत युरियाची कृत्रिम टंचाईगडचिरोली : जिल्ह्यात दोन महिन्यानंतर बरसलेल्या...
परभणीत बँकांचे उंबरठे झिजवून...परभणी : यंदा खरीप हंगामात जिल्ह्यातील बॅंका...
मुंगळा परिसरात रानडुकरांचा धुडगूसमुंगळा जि. वाशीम ः चांगल्या पावसामुळे यंदा या...
‘रासाका’ सुरू करा, अन्यथा उपोषण’नाशिक : यंदाचा ऊस गाळप हंगाम ऑक्टोबर महिन्यापासून...
एफआरपी थकविणाऱ्या कारखान्यांवर कारवाई...नांदेड ः प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालया...