इचलकरंजीत बाजार समितीचे व्यवहार सुरू

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : शहरातील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात भाजीपाल्याचे सौदे सुरू झाले आहेत. यामुळे बाजार समितीचेही उत्पन्न सुरू झाले असून १२५ जणांचा रोजगार पुन्हा सुरू झाला आहे.
Ichalkaranji market committee resumes business
Ichalkaranji market committee resumes business

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : शहरातील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात भाजीपाल्याचे सौदे सुरू झाले आहेत. यामुळे बाजार समितीचेही उत्पन्न सुरू झाले असून १२५ जणांचा रोजगार पुन्हा सुरू झाला आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील बाजार समितीतील भाजीपाल्याचे सौदे, आवक ठप्प होती. नगरपालिकेने निश्‍चित केलेल्या २२ ठिकाणी पहिल्या लॉकडाऊनपासून आजही बाजार खुला भरवला जात आहे. पण बाजार समितीतील सौदेच बंद असल्याने भाजीपाला विक्रीच्या दरात मोठी तफावत असल्याचे चित्र सर्वच बाजारात होते.

ग्राहकांनाही नाईलाजास्तव जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत होता. पण आता राज्यातील इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे आणि सौदेही सुरू झाल्याने योग्य दरात भाजीपाला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात शेतीमाल फेकून देण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांनाही आता आपला शेतीमाल बाजार समितीत विकता येणार आहे.

कोरोनामुळे बाजार समितीला लाखोंचा तोटा सहन करावा लागला. त्यात येथे काम करणाऱ्यांचा रोजगार हिरवला. पण सध्या सकाळपासून दुपारपर्यंत इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. आठवड्यातून दोनवेळा कांदा बटाटाच्या दोन ट्रकांची आवक होते. शिवाय सकाळच्या सत्रात इतर भाजीपालाही येत आहे. पण कर्नाटकातून येणारा पूर्णच माल बंद झाल्याने काही अंशी भाजीपाल्याचा तुटवडा भासत असल्याचे अडत व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजार समितीतील सौदे रितसर सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे हा प्रमुख उद्देश आहे. कर्नाटक वगळता इतर जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक होत आहे. आता काही दिवसांपासून कोलमडलेला बाजारभाव नियंत्रित होईल. - आनंदराव पाटील, सचिव, वडगांव कृषी उत्पन्न बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com