Agriculture news in Marathi Ichalkaranji market committee resumes business | Agrowon

इचलकरंजीत बाजार समितीचे व्यवहार सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 मे 2020

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : शहरातील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात भाजीपाल्याचे सौदे सुरू झाले आहेत. यामुळे बाजार समितीचेही उत्पन्न सुरू झाले असून १२५ जणांचा रोजगार पुन्हा सुरू झाला आहे.

इचलकरंजी, जि. कोल्हापूर : शहरातील वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीच्या बाजारात भाजीपाल्याचे सौदे सुरू झाले आहेत. यामुळे बाजार समितीचेही उत्पन्न सुरू झाले असून १२५ जणांचा रोजगार पुन्हा सुरू झाला आहे.

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शहरातील बाजार समितीतील भाजीपाल्याचे सौदे, आवक ठप्प होती. नगरपालिकेने निश्‍चित केलेल्या २२ ठिकाणी पहिल्या लॉकडाऊनपासून आजही बाजार खुला भरवला जात आहे. पण बाजार समितीतील सौदेच बंद असल्याने भाजीपाला विक्रीच्या दरात मोठी तफावत असल्याचे चित्र सर्वच बाजारात होते.

ग्राहकांनाही नाईलाजास्तव जादा दराने भाजीपाला खरेदी करावा लागत होता. पण आता राज्यातील इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला येत आहे आणि सौदेही सुरू झाल्याने योग्य दरात भाजीपाला मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात शेतीमाल फेकून देण्याची वेळ आलेल्या शेतकऱ्यांनाही आता आपला शेतीमाल बाजार समितीत विकता येणार आहे.

कोरोनामुळे बाजार समितीला लाखोंचा तोटा सहन करावा लागला. त्यात येथे काम करणाऱ्यांचा रोजगार हिरवला. पण सध्या सकाळपासून दुपारपर्यंत इतर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होत आहे. आठवड्यातून दोनवेळा कांदा बटाटाच्या दोन ट्रकांची आवक होते. शिवाय सकाळच्या सत्रात इतर भाजीपालाही येत आहे. पण कर्नाटकातून येणारा पूर्णच माल बंद झाल्याने काही अंशी भाजीपाल्याचा तुटवडा भासत असल्याचे अडत व्यापाऱ्यांनी सांगितले.

बाजार समितीतील सौदे रितसर सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देणे हा प्रमुख उद्देश आहे. कर्नाटक वगळता इतर जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक होत आहे. आता काही दिवसांपासून कोलमडलेला बाजारभाव नियंत्रित होईल.
- आनंदराव पाटील,
सचिव, वडगांव कृषी उत्पन्न बाजार समिती


इतर बातम्या
माया आणि छायेची पालवी पुन्हा फुलणार... नाशिक : हल्ली विकासकामांच्या नावाखाली मोठ्या...
नगर जिल्ह्यात ‘निसर्ग'चा शेतीपिकांना...नगर : कोकण आणि मुंबईला तडाखा देणारे निसर्ग...
दापोली, मंडणगडमध्ये बागांना फटकारत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक तडाखा...
सिंधुदुर्गात पावसाचा जोर ओसरला सिंधुदुर्ग : जिल्ह्याला बुधवारी (ता.३) वादळी...
पुणे जिल्ह्यात ‘निसर्ग’चे थैमान पुणे : निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी (ता.३)...
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांत फळबागांना...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे...नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर...
मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी व्यापली;...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘निसर्ग’चा शेतीला मोठा तडाखापुणेः निसर्ग चक्रीवादळामुळे राज्याला वादळी...
कापसाची ३७१ लाख क्विंटल खरेदीनागपूर ः राज्यात आतापर्यंत कापसाची हमीभावाने ३७१....
पुणे जिल्ह्यात पॉलिहाऊसचे मोठे नुकसानपुणेः कोरोना टाळेबंदीमध्ये बाजार समित्यांसह...
कापूस नोंदणीला उद्यापर्यंत मुदतवाढअमरावती ः शासकीय हमीभाव योजनेअंतर्गंत कापूस...
राज्यात गुरांचे बाजार सुरु करण्याचे आदेशअकोला ः कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने...
संकटाच्या मालिका सोसून द्राक्ष हंगामाची...नाशिक: यंदा जिल्ह्यातील द्राक्ष हंगामावर सतत...
लॉकडाउनमध्ये गजबजली ई-चावडीपुणे: शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी सुरू करण्यात...
मॉन्सून कर्नाटकात दाखल, कारवार,...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
‘चक्रीवादळ’ ओसरले; खानदेशासह पश्‍चिम...पुणे : अरबी समुद्रात आलेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ...
जीवनावश्‍यक वस्तू कायदा, मुक्त शेतीमाल...नवी दिल्ली : आत्मनिर्भर भारत योजनेत जाहीर...
टोळधाड मध्यप्रदेशात, ड्रोन पोचला...नागपूर ः गेल्या दहा दिवसांपासून विदर्भातील...
एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविले मुंबई: निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान होऊ नये...