‘इडा पिडा टळो...’च्या घोषणांनी दणाणली बळिराजा मिरवणूक

‘इडा पिडा टळो...’च्या घोषणांनी दणाणली बळिराजा मिरवणूक
‘इडा पिडा टळो...’च्या घोषणांनी दणाणली बळिराजा मिरवणूक

पुणे : सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या वतीने यंदा बळिराजा गौरव मिरवणुकीचे बलिप्रतिपदेला (ता. ८) आयोजन करण्यात आले. ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’, ‘सत्य की जय हो’चा गजर करीत बळिराजा गौरव मिरवणूक महात्मा फुले यांच्या वाड्यापासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लाल महालापर्यंत ढोल ताशांच्या निनादात काढण्यात आली.

ज्‍येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते प्रतीकात्मक बळिराजाला हार घालून मिरवणुकीस प्रारंभ झाला. गंज पेठ, गौरी आळी, बोहरी आळी, फडके हौद मार्गे मिरवणूक लाल महाल येथे पोचली.

या मार्गात विविध सामाजिक संघटनांनी बळिराजाचे स्वागत केले. कृषिधनाने सजलेल्या बैलगाड्यावर बळिराजाचा सजीव देखावा करण्यात आला होता, पुढे ढोलपथक होते. रघुनाथ ढोक यांनी बळिराजा साकारला होता. लाल महाल येथे समारोप कार्यक्रमात महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे ॲड. मोहन वाडेकर यांनी मार्गदर्शन केले.

या वेळी ज्‍येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंकल सोनवणे, प्रा. प्रतिमा परदेशी, प्राची दुधाने, रमेश राक्षे, अतुल बहुले, विजया थोरात, विलास टेकाळे, संजय धावरे, श्री. नलावडे,  निशा भगत, अनिता टेकाळे, संगीता कोरडे, संतोष शिंदे, रवी झेंडे, सुरेखा भारती, काशीनाथ मोरे उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन बगाडे यांनी केले.  व्ही. जे. वळवी यांनी आभार मानले.

या वेळी प्रा. परदेशी यांनी लिहिलेले विश्व सम्राट बळिराजा या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मिरवणूक यशस्वी करण्यासाठी प्रतीक परदेशी, आकाश ढोक, नवनाथ लोंढे, राजेंद्र शेलार, प्रमोद राठोड, आप्पा चव्हाण यांनी परिश्रम घेतले. मिरवणुकीचे यंदा १५ वे वर्ष होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com