agriculture news in marathi identify adulterantation in milk | Agrowon

..अशी ओळखा दुधातील भेसळ

डॉ. अरविंद सावते, सुग्रीव शिंदे
रविवार, 26 जानेवारी 2020

वाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते किंवा त्याच्या दर्जा कमी केला जातो. अशा भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होते. त्या दृष्टिने काळजी घ्यावी.

वाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते किंवा त्याच्या दर्जा कमी केला जातो. अशा भेसळयुक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे आपल्या शरीराला नुकसान होते. त्या दृष्टिने काळजी घ्यावी.

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) मते, भारतात विकले जाणारे जवळपास १० टक्के दूध आरोग्यासाठी हानिकारक आहे. या १० टक्क्यांमध्ये ४० टक्के प्रमाण हे पिशवीबंद दुधाचे आहे. भेसळयुक्त पदार्थांचे सेवन करणाऱ्या लोकांना आतड्यांचे विकार, यकृत आणि किडनीसंबंधी आजार होण्याचा धोका संभावतो.
 
दुधातील पाण्याचे निदान 

  • एका पॉलिश केलेल्या फरशीवर दुधाचे काही थेंब टाका. दुधात पाणी असेल तर ते लगेच पुढे सरकेल व कोणतेही डाग दिसणार नाहीत. मात्र दुधात पाणी मिसळले नसल्यास, ते पटकन पुढे किंवा मागे सरकणार नाही व त्याजागी पांढरे डाग पडतात.

युरियाची भेसळ 

  • एका परीक्षा नळीमध्ये ५ मिलि दूध घेऊन त्यात ब्रोमोथायलॉन या निळ्या औषधाचे २ थेंब टाकून दहा मिनिटे ठेवावे. युरियाची भेसळ असल्यास, द्रावणास निळा रंग येईल.

डिटर्जंटची भेसळ 

  • ५ ते १० मिलि दूध चांगले हालवून घ्यावे. दुधाला फेस किंवा फेसाप्रमाणे जाड थर तयार झाल्यास, भेसळ आहे असे समजावे.

स्टार्चची भेसळ

  • दुधात २ ते ३ थेंब टिंक्चर आयोडीन टाकावे. भेसळ असल्यास निळा रंग येईल.

पनीर आणि खव्यातील स्टार्चची भेसळ 

  • पनीर अथवा खव्याचा थोडा नमुना पाण्यात उकळून घ्यावा. मिश्रण थंड करून त्यात आयोडीनचे २ ते ३ थेंब टाकावे. स्टार्चची भेसळ असल्यास, निळा रंग येतो.

तुपामध्ये बटाटे किंवा रताळ्याचा गर आणि इतर स्टार्चची भेसळ 

  • अर्धा चमचा तूप एका पारदर्शक वाटीत घ्यावे. त्यात दोन ते तीन थेंब आयोडिन घालावे. भेसळ असल्यास, तुपाला निळा रंग येतो.

तुपामध्ये वनस्पती तुपाची भेसळ 

  • एका छोट्या वाटीत चमचाभर तूप किंवा लोणी गरम करून घ्यावे. त्यात चमचाभर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि चिमूटभर साखर टाकून मिश्रण थोडे हालवून नंतर ५ मिनिटे स्थिर ठेवावे. वनस्पती तुपाची भेसळ असल्यास, मिश्रणाच्या तळाला नारिंगी थर दिसेल.

आइस्क्रीममध्ये डिटर्जंटची भेसळ

  • भेसळयुक्त आइस्क्रीममध्ये लिंबाचे काही थेंब टाकल्यास बुडबुडे येतात. याउलट भेसळ नसल्यास बुडबुडे येत नाहीत.

आइस्क्रीममध्ये सॅकॅरिनची भेसळ 

  • आइस्क्रीममधील सॅकॅरिनची भेसळ चवीवरून ओळखता येते. सॅकॅरिनची गोड चव जिभेवर जास्त वेळ राहून नंतर कडवट चव तयार होते.

संपर्कः डॉ. अरविंद सावते, ९४२२१७६३५४
(अन्नतंत्र महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)


इतर कृषिपूरक
व्यावसायिक गांडूळखत प्रकल्प उभारणीभाऊसाहेब गावात आल्याची बातमी समजली. सर्व बचत...
कृषी पर्यटन ः आव्हानात्मक पूरक व्यवसायवसंताच्या मनातील कृषी पर्यटनाच्या विचाराला...
ऋतुमानानुसार म्हशीतील प्रजनन व्यवस्थापनअधिक दूध उत्पादनाकरिता म्हशीमधील प्रजनन सक्षम...
जैवपुंज निर्मितीसाठी विविध कार्बन स्रोतपाण्याचे तापमान, सामू, विरघळलेला प्राणवायू...
जनावरांच्या आहारामध्ये पोषकद्रव्ये...दुधाळ जनावरांच्या शरीराची प्रसूतिदरम्यान झालेली...
मेंढ्यांची संवाद साधण्याची पद्धतमेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात...
मत्स्यशेतीसाठी पाण्याची गुणवत्ता...मत्स्यशेती यशस्वी होण्यासाठी मत्स्य टाक्यांची...
वयानुसार पुरवा कोंबड्यांना संतुलित खाद्यकुक्कुटपालनामध्ये एकूण खर्चाच्या जवळ जवळ ६० ते ७०...
फळबागेला दिली शेळीपालनाची जोडअजगणी (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील जगदीश...
जनावरांतील गोचीड तापगोचीड कान, पंजा, उदर, बारीक व नाजूक त्वचा तसेच...
जाणून घ्या ग्राहक संरक्षण अधिनियम, १९८६ग्राहकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करण्यासाठी...
शेळ्यांना द्या समतोल आहार शेळीच्या प्रजननक्षमता वाढीस आहाराचे...
मेंढीपालनाचे वार्षिक वेळापत्रकगाभण मेंढ्यांकडे विशेष लक्ष द्यावे. नवजात...
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...