संकट ओळखून पाण्याचा वापर करा : कुलगुरू डॉ. फडणवीस

संकट ओळखून पाण्याचा वापर करा : कुलगुरू डॉ. फडणवीस
संकट ओळखून पाण्याचा वापर करा : कुलगुरू डॉ. फडणवीस

सोलापूर  : आगामी काळातील पाणी संकट ओळखून सर्वांनी पाणी जपून वापरावे. पर्यावरण निरोगी राहण्यासाठी झाडे लावावीत, असे आवाहन पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पर्यावरणशास्त्र विभाग आणि ड्रीम फाउंडेशनतर्फे जल, वन, हवामान दिनानिमित्त राष्ट्रीय जलसाक्षरता कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी डॉ. फडणवीस बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. लालासाहेब तांबडे, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील वरिष्ठ संशोधक डी. टी. मेश्राम, अभियंता शाहीर रमेश खाडे, आयजीएमसी गोवाच्या संचालिका डॉ. अरुणा गजभिये, पाणी फाउंडेशनचे डॉ. रवींद्र गजभिये, भूशास्त्र संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. आर. बी. भोसले, पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. व्ही. पी. धुळप आदी उपस्थित होते.

डॉ. फडणवीस म्हणाल्या,''पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होणे आवश्‍यक आहे. यासाठी ग्रीन झोन तयार करणेही आवश्‍यक आहे. वृक्ष लागवड झाल्यास पावसाचे प्रमाणही वाढेल.''

 बिराजदार म्हणाले, ''शासनाने जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राबविल्याने पाणी पातळी वाढली. आपल्याकडे पावसाची अनियमितता असल्याने दर दोन-तीन वर्षांनी दुष्काळाशी सामना करावा लागतो. त्यामुळे काळजी घेऊन उपाययोजना करणे आवश्‍यक अाहे.''

या वेळी डॉ. मेश्राम, गजभिये यांनीही मार्गदर्शन केले. ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशिनाथ भतगुणकी यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com