हवामान बदलाची दिशा ओळखा : शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी Identify the direction of climate change: Scientist Dr. Anil Kulkarni
हवामान बदलाची दिशा ओळखा : शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी Identify the direction of climate change: Scientist Dr. Anil Kulkarni

हवामान बदलाची दिशा ओळखा : शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्‌भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपणास सामोरे जावे लागणार आहे.

कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्‌भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपणास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मानवाने हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी येथे केले.  शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलिटी स्टडिज’मार्फत ‘हवामान बदल व शाश्‍वत विकास’ या विषयावरील व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘तापमानवाढ व जलस्रोतांवर होणारा परिणाम’ या विषयावर डॉ. कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.  डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘हिमालयामध्ये अनेक पर्वतरांगा आहेत, ज्यात शिवालिक, पीर पंजाल, ग्रेट हिमालय, काराकोरम अशा पर्वत रांगांचा समावेश होतो. पैकी दक्षिणेकडील शिवालिक पर्वत रांग वगळता इतर पर्वत रांगांमध्ये प्रामुख्याने बर्फ आढळतो. उत्तर भारतात सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांची खोरी आहेत. हवामान बदलामुळे या नद्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. १९६० पर्यंत भारताच्या इतर भागांशी तुलना करता हिमालयीन क्षेत्र थंड होते. पण जसा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव वाढत गेला, तसे हिमालयीन क्षेत्रामधील तापमान वाढत गेल्याचे दिसून येते. या वाढत्या तापमानामुळे पर्वत रांगांमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. जवळपास उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतू बदलानुसार तेथील भूपृष्ठात ७५ टक्के बदल दिसून येतो. वितळलेल्या बर्फामुळे सिंधू खोऱ्यात ७० टक्के पाणीपुरवठा होतो. गंगा नदी खोऱ्यात त्याचे प्रमाण केवळ १०-१५ टक्के असून, ब्रह्मपुत्रा खोऱ्यात ते त्यापेक्षा कमी होते.’’  डॉ. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘हवामान बदलांचे दुष्परिणाम सार्वत्रिक आहेत. मानवी समुदायाबरोबरच पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होतो आहे. या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन व उपाययोजना करण्याची गरज आहे.’’ या ऑनलाइन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध विद्यापीठांतील अभ्यासक, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com