Agriculture News in Marathi Identify the direction of climate change: Scientist Dr. Anil Kulkarni | Page 2 ||| Agrowon

हवामान बदलाची दिशा ओळखा : शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021

हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्‌भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपणास सामोरे जावे लागणार आहे.

कोल्हापूर : हवामान बदलांचा सर्वाधिक परिणाम बर्फाळ प्रदेशावर होतो. बर्फ वितळून उद्‌भवणाऱ्या आपत्तीला येत्या ३० ते ५० वर्षांत आपणास सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे मानवाने हवामान बदलांची दिशा ओळखून वेळीच सावधगिरीची पावले उचलण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेंगलोर येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल कुलकर्णी यांनी येथे केले. 

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर क्लायमेंट चेंज व सस्टेनॅबिलिटी स्टडिज’मार्फत ‘हवामान बदल व शाश्‍वत विकास’ या विषयावरील व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना ‘तापमानवाढ व जलस्रोतांवर होणारा परिणाम’ या विषयावर डॉ. कुलकर्णी बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते. 

डॉ. कुलकर्णी म्हणाले, ‘‘हिमालयामध्ये अनेक पर्वतरांगा आहेत, ज्यात शिवालिक, पीर पंजाल, ग्रेट हिमालय, काराकोरम अशा पर्वत रांगांचा समावेश होतो. पैकी दक्षिणेकडील शिवालिक पर्वत रांग वगळता इतर पर्वत रांगांमध्ये प्रामुख्याने बर्फ आढळतो. उत्तर भारतात सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा या प्रमुख नद्यांची खोरी आहेत. हवामान बदलामुळे या नद्या मोठ्या प्रमाणात प्रभावित होतात. १९६० पर्यंत भारताच्या इतर भागांशी तुलना करता हिमालयीन क्षेत्र थंड होते.

पण जसा ग्लोबल वॉर्मिंगचा प्रभाव वाढत गेला, तसे हिमालयीन क्षेत्रामधील तापमान वाढत गेल्याचे दिसून येते. या वाढत्या तापमानामुळे पर्वत रांगांमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळतो आहे. जवळपास उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतू बदलानुसार तेथील भूपृष्ठात ७५ टक्के बदल दिसून येतो. वितळलेल्या बर्फामुळे सिंधू खोऱ्यात ७० टक्के पाणीपुरवठा होतो. गंगा नदी खोऱ्यात त्याचे प्रमाण केवळ १०-१५ टक्के असून, ब्रह्मपुत्रा खोऱ्यात ते त्यापेक्षा कमी होते.’’ 

डॉ. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘हवामान बदलांचे दुष्परिणाम सार्वत्रिक आहेत. मानवी समुदायाबरोबरच पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होतो आहे. या दुष्परिणामांना अटकाव करण्यासाठी संशोधकांनी मोठ्या प्रमाणावर चिंतन व उपाययोजना करण्याची गरज आहे.’’ या ऑनलाइन कार्यक्रमासाठी देशभरातील विविध विद्यापीठांतील अभ्यासक, विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्राचे समन्वयक डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले.


इतर बातम्या
रत्नागिरी जिल्ह्यात माॅन्सूनोत्तर...रत्नागिरी ः अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब...औरंगाबाद : ‘‘एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा...
नाशिक : मॉन्सूनोत्तर शेतकऱ्यांवर मोठे... नाशिक : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यातील...
नळपाणी योजनांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतसांगली ः जलजीवन मिशनअंतर्गत नळपाणी पुरवठा...
परभणी जिल्ह्यात ‘कर्जमुक्ती’पासून सहा...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
रब्बी हंगामातील पीक स्पर्धेत भाग...नांदेड : ‘‘रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा,...
मराठा आंदोलनात मृत्यू झालेल्यांच्या...नांदेड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत्युमुखी...
‘तहसील’चा वीजपुरवठा खंडित;  थकबाकी न...नंदुरबार ः वेळोवेळी तगादा लावून व अखेर थकबाकी...
हळदीचे दर स्थिर सांगली ः सध्या देशभरात देशात हळदीची ३७ लाख पोती...
ऊस पाचट वजावटीपोटी  २२५ कोटींवर डल्ला पुणे ः यंत्राने होणाऱ्या ऊसतोडीत पाचटाच्या...
उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्रात जोरदार...पुणे : अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब...
देशातील ७२ गावे होणार ‘व्हिलेज ऑफ एक्‍...नागपूर ः केंद्र सरकार, राज्य सरकार आणि इस्राईल...
राज्य, परराज्यातील मजुरांचा  कडवंची...जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून...
निसर्गाच्या साक्षीने रंगली गोष्ट एका...अकोला ः सातपुड्याच्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेल्या...
शेततळ्याच्या अनुदानासाठी नगरला सर्वाधिक...नगर ः नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या...
शिरूरमध्ये दोन हजार रोहित्रे बंद पुणे : वीजबिल थकल्याने महावितरण शिरूर उपविभागातील...
साडेपाच लाख टन सोयापेंड  आयातीसाठी...पुणे ः केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम...
तुरीच्या पिकाकडून तूट भरून निघण्याची आशासाखरखेर्डा, जि. बुलडाणा ः यंदा या परिसरात तुरीचे...
जालन्यात विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे...जालना : मोसंबीचा विमा संरक्षण कालावधी १५ सप्टेंबर...
कृषिपंपांची वीजतोडणी मोहीम तत्काळ...हिंगणा, जि. नागपूर : महावितरण कंपनीने कृषिपंपाचे...