agriculture news in marathi Identify the diseases in animals and treat them | Agrowon

कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करा

के.ए. बुरगुटे, एस.ए. दळवे
मंगळवार, 19 मे 2020

गाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज ठरविलेल्या वेळेत दूध काढावेत. दुधाच्या धारा पूर्णपणे काढाव्यात, अर्धवट काढू नयेत. कासेवर किंवा सडावर जखमा होऊ देऊ नयेत.पशूतज्ज्ञांच्या सल्याने उपचार करावेत.

गाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज ठरविलेल्या वेळेत दूध काढावेत. दुधाच्या धारा पूर्णपणे काढाव्यात, अर्धवट काढू नयेत. कासेवर किंवा सडावर जखमा होऊ देऊ नयेत.पशूतज्ज्ञांच्या सल्याने उपचार करावेत.

कासदाह हा आजार गाई,म्हशींमध्ये दिसून येतो. व्यायल्यावर आणि विण्यापूर्वी १५ दिवस अगोदर हा आजार जास्त प्रमाणात आढळून येतो. यामुळे दुधाळ जनावरांची कास कडक होते.

कारणे

 • गोठ्यातील अस्वच्छता
 • धारा काढणाऱ्या माणसाचे हात अस्वच्छ असल्यास
 • कास धुण्यासाठी अस्वच्छ पाण्याचा वापर केल्यास
 • जनावरांचे दूध वेळेवर न काढल्याने किंवा अर्धवट काढल्यास

लक्षणे

 • आजारी जनावरांची कास घट्ट होते. दुधाच्या गाठी होतात.
 • दूध काढल्यानंतर रंग पिवळसर किंवा लालसर होतो.
 • कास कडक किंवा दगडासारखी होते. जनावरांस वेदना होतात. वेदना झाल्यामुळे जनावर कासेला हात लावू देत नाही.
 • जनावरांना ताप येतो, पांढऱ्या पेशींचे प्रमाण वाढते.
 • चारा व पाण्याचे कमी प्रमाणात सेवन करतात.
 • कासेमध्ये गाठी झाल्यास दूध येणे बंद होते. त्यानंतर सडातून फक्त पाणी येते.

रोग होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी

 • धार काढताना जनावरे स्वच्छ जागी बांधावी.
 • दूध काढणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ असावेत व तो निरोगी असावा.
 • धार काढण्यापूर्वी जनावरांची कास पोटॅशिअम परमॅंगनेटच्या १ टक्के द्रावणाने स्वच्छ धुवून घ्यावी.
 • कासेवर किंवा सडावर जखमा होऊ देऊ नयेत.
 • जनावरांचे दूध दररोज ठरविलेल्या वेळेत काढावेत. दूध धारा पूर्णपणे काढाव्यात, अर्धवट काढू नयेत.
 • धार काढल्यानंतर जनावरास खाण्यास चारा किंवा वैरण द्यावी. त्यामुळे जनावर खाली बसत नाही. सडांची छिद्र बंद होण्यास लागणारा वेळ जनावर उभे असतानाच निघून जातो.

उपाययोजना 

 • बाधित जनावर त्वरित वेगळे बांधावे.
 • या जनावरांची धार सर्वात शेवटी काढावी.
 • रोग झालेल्या सडातील दूध पूर्णपणे पिळून काढावे. दूषित दूध वेगळे काढून नष्ट करावे.
 • कास व सड पोटॅशिअम परमॅग्नेटच्या द्रावणाने धुवावी.
 • पशुवैद्यकाच्या सल्याने उपचार करावेत.
 • आजारी जनावर पूर्णपणे बरे झाल्यानंतरच इतर जनावरांच्या गोठ्यात बांधावे.

संपर्क - प्रा. एस.ए. दळवे, ८३८१०६७८७२
(कृषी महाविद्यालय, आळणी, जि.उस्मानाबाद)


इतर कृषिपूरक
जनावरातील मिथेन वायू उत्सर्जन कमी...जनावरांनी खालेल्या चाऱ्यांवर कोठीपोटात जिवाणू,...
चारा टंचाईच्या काळातील पशुआहार...उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची टंचाई भासत असते. त्याला...
शेळ्यांसाठी दशरथ घासदशरथ घास या चारा पिकाच्या लागवडीसाठी हलक्या ते...
दूध एक ‘पोषक आहार’१ जून हा जागतिक दूध दिवस म्हणून साजरा केला जातो....
कोंबड्यांमध्ये दिसते खनिजांची कमतरताकोंबड्यांच्या आहारातील खनिजे विविध प्रकारची...
जनावरांना द्या पुरेसे खनिज मिश्रणजनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा...
शेळ्यांसाठी पौष्टिक चारा - शेवगा पालाशेळीपालन व्यवसायाचे यश हे मुख्यत्त्वे वापरलेल्या...
उष्णतेच्या लाटेत जनावरे सांभाळाजनावरे सावलीत, थंड ठिकाणी, खेळती हवा असणाऱ्या...
मत्स्यशेतीकरीता शेततळ्याची पूर्वतयारीयेत्या वर्षांत शेततळ्यामध्ये उत्तम मत्स्य उत्पादन...
जनावरांना चावणाऱ्या माशांवर नियंत्रण...लम्पी स्कीन डिसीज या आजाराच्या विषाणूचा प्रसार...
मधमाशांच्या संवर्धनासह व्यावसायिक...मधमाशांद्वारे वनस्पतीमध्ये होणारे परागीभवन व...
पशुपालक,पशुतज्ज्ञांनो आरोग्याची घ्या...जनावरांच्या गोठ्यात काम करणारे नियमित मजूर किंवा...
कासदाहाची लक्षणे ओळखा, उपचार करागाई, म्हशींना कासदाह होऊ नये यासाठी दररोज...
कृषी सलग्न व्यवसायासाठी ‘मुद्रा’मुद्रा योजनेत तीन प्रकार आहेत.  शिशू...
सेक्स सॉर्टेड सीमेन : पशुपालनातील नवीन...गाई विताना अधिक प्रमाणात कालवडीचा जन्म व्हावा...
मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धतीभारतामध्ये मत्स्यपालनाची बायोफ्लॉक पद्धती ही नवीन...
कलिंगडापासून बनवा जॅम,योगर्टकलिंगडामध्ये जीवनसत्त्व अ आणि क भरपूर प्रमाणात...
जनावरांच्या आहारात काटे विरहीत...काटे विरहीत निवडुंगांमध्ये शुष्कपदार्थ, प्रथिने,...
हायड्रोपोनिक्‍स तंत्राद्वारे चारा...हायड्रोपोनिक्स तंत्राद्वारे सात ते दहा दिवसांत...
जनावरांना खुराकासोबत द्या बायपास...जनावरांना चाराटंचाईच्या काळात हवी तेवढी प्रथिने...