Agriculture news in marathi Identify the needs in agriculture: Dr. Singh | Agrowon

शेतीमधील गरज ओळखा ः डॉ. सिंग

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

जालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतीमधील गरज ओळखून कौशल्याधारित प्रशिक्षणाचे नियोजन करण्याची गरज आहे,’’ असे मत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान व अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी व्यक्‍त केली. 

जालना : ‘‘कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी शेतीमधील गरज ओळखून कौशल्याधारित प्रशिक्षणाचे नियोजन करण्याची गरज आहे,’’ असे मत पुणे येथील कृषी तंत्रज्ञान व अनुप्रयोग संशोधन संस्थेचे संचालक डॉ. लाखन सिंग यांनी व्यक्‍त केली. 

भारतीय कृषी कौशल्य परिषद नवी दिल्ली, कृषी तंत्रज्ञान अनुप्रयोग संशोधन संस्था (अटारी) पुणे आणि कृषी विज्ञान केंद्र खरपुडीतर्फे गुरूवारपासून (ता. ५) कृषी क्षेत्रातील कौशल्य विकास कार्यक्रम घेण्यात आला. त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली. उद्‌घाटन सत्राला कृषी विज्ञान केंद्राचे प्रकल्प संचालक विजयअण्णा बोराडे, कृषी कौशल्य विकास परिषदेच्या पुणे येथील विभागीय प्रमुख सायली महाडिक, दिल्ली येथील प्रा. श्याम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे आदींची उपस्थिती होती. 

डॉ. सिंग म्हणाले, ‘‘कौशल्याधारित प्रशिक्षणाद्वारे युवकांना आपला व्यवसाय सक्षमपणे व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची कला अवगत होईल. शास्त्रज्ञांनी ग्रामीण भागातील युवक व युवतींना कृषी उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करावी.’’

बोराडे म्हणाले, ‘‘ ७ डिसेंबरपर्यंत तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात तीनही राज्यांतील जवळपास ५४ शास्त्रज्ञ प्रशिक्षक सहभागी झाले आहेत. विविध विषयांवरील शास्त्रज्ञांचा यामध्ये समावेश आहे. या प्रशिक्षणाद्वारे ग्रामीण बेरोजगार तरुणांना कृषी कौशल्य विकास आधारित प्रशिक्षण देऊन सक्षम करणे हा आयोजनामागील उद्देश आहे.’’

व्ही. सोनुने म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी कृषी विज्ञान केंद्रांमधील शास्त्रज्ञ नेहमीच तत्पर असतात. प्रशिक्षणाच्या माध्यमातून तीन राज्यातील शास्त्रज्ञांमध्ये विचारांची देवाणघेवाण होऊन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होणे अपेक्षित आहे.’’ गृहविज्ञान तज्ज्ञ संगीता गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी यांनी आभार मानले. 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ४३ हजार...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सांगोल्यात डाळिंब व्यापाऱ्याला पुन्हा...सांगोला, जि. सोलापूर : सांगोल्यातील एका...
विजेबाबतच्या समस्या निकाली काढा : डॉ....बुलडाणा  : विजेच्या बाबत नागरिकांना अनेक...
चाळीसगाव : किसान सन्मानच्या लाभापासून...चाळीसगाव, जि. जळगाव ः शासनाकडून राबविण्यात...
जिल्हा परिषदांचे तलाव मासेमारीसाठी खुले...मुंबई : राज्यातील ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा...
खानदेशात तूर नोंदणीला प्रतिसादजळगाव  ः जिल्ह्यात तूर नोंदणीसंबंधी १०...
नागपूर जिल्ह्यात रब्बीच्या क्षेत्रात...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसाने खरीप पिकाचे चांगलेच...
मागासवर्गीयांपर्यंत फडणवीस सरकारच्या...मुंबई: राज्यात गत सरकारच्या कार्यकाळात...
सिंचन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी निधी...मुंबई : जलसंपदा विभागाचे प्रलंबित प्रकल्प पूर्ण...
औरंगाबादेत पाणीप्रश्‍नावर भाजपचे उद्या...औरंगाबाद : नेहमी दुष्काळाशी सामना करणाऱ्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...