चिकन आयात केल्यास  पोल्ट्री व्यवसायावर संकट

आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्या, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे.
If chicken is imported Crisis on poultry business
If chicken is imported Crisis on poultry business

सांगली ः आम्हालाही चिकन आयातीची परवानगी द्या, अशी मागणी राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार पाशा पटेल यांनी केली आहे. ही मागणी पूर्णतः आर्थिकदृष्ट्या चुकीची आहे. चिकन आयात केले तर पोल्ट्री व्यवसायावर अनिष्ट परिणाम दिसतील, असे मत शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केले. रघुनाथदादा पाटील म्हणाले, ‘‘देशात मोठ्या प्रमाणात पोल्ट्री व्यवसाय केला जातो. सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे. सोयाबीनचे दर नियंत्रित करण्यासाठी केंद्राने पाऊले उचलावीत, अशी मागणी पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने केली आहे. मात्र ही मागणी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मारक ठरणारी आहे. परंतु पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने ही केलेली मागणी अव्यवहारी आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करणारी आहे. केंद्र सरकारने सोयाबीनची आयात करुन शेतकऱ्यांच्यात माती कालवण्याचे काम केले आहे. आता पाशा पटेल यांची चिकन आयातीची केलेली मागणी पोल्ट्रीधारक शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान करणारी आहे. या देशात पोल्ट्री व्यवसाय फक्त ब्रीडर्स असोशिसएशनचे पोल्ट्री व्यवसाय करतात असे नाही. लहान मोठे शेतकरी, शेत मजूर देखील शंभर पक्ष्यांपासून ते पाच हजार पक्ष्यांपर्यंत कर्ज काढून पोल्ट्री व्यवसाय करत आहेत. त्यामुळे पाशा पटले यांनी केलेल्या मागणीमुळे देशातील लहान व मोठ्या पोल्ट्री धारकांचे नुकसान होऊन व्यवसाय संकटात येईल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com