वीजबिले माफ न केल्यास कंपनीचे कार्यालय जाळू ः तुपकर

बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे घरगुती व लघू व्यावसायिकांचे वीज बिल माफ करावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात वीज वितरण कंपनीच्या बुलडाणा कार्यालयासमोर बिलांची होळी करण्यात आली.
If electricity bills are not waived, the company's office will burn down: Tupkar
If electricity bills are not waived, the company's office will burn down: Tupkar

बुलडाणा ः लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्यांचे घरगुती व लघू व्यावसायिकांचे वीज बिल माफ करावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात सोमवारी (ता. १३) वीज वितरण कंपनीच्या बुलडाणा कार्यालयासमोर बिलांची होळी करण्यात आली. आज फक्त बिले जाळली, बिले माफ न केल्यास वीज कंपनीचे कार्यालय जाळू, असा इशारा श्री. तुपकर यांनी दिला.

कोरोनाच्या प्रादुर्भावाने राज्यात लॉकडाउनच्या काळात तीन महिन्यांतील घरगुती वीज बिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. अव्वाच्या सव्वा दराने विजेची आकारणी झाल्याने सर्वसामान्यांची वीज बिले दुप्पट व तिप्पट आलेली आहेत. एप्रिल महिन्यापासून ५ ते १५ टक्के बिलामध्ये वाढ झालेली आहे. तसेच एकूण तीन महिन्यांचे युनिट बिलामध्ये समाविष्ट झाल्याने जादा युनिटचा फटका सर्वांनाच बसलेला आहे. लॉकडाउनच्या काळात सर्व लघुव्यवसाय बंद होते. दुकाने बंद असतानाही त्यांना वाढीव बिले आली आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी सुरू असून रोजगार देखील बुडालेला आहे. घरगुती व लघू व्यावसायिकांच्या वीज बिलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. वीज वितरण कंपनीने घरगुती व लघू व्यावसायिकांच्या वीज बिलांमध्ये झालेली दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अशी मागणी यावेळी केली.

आर्थिक परिस्थिती ढासळल्याने ही वीज बिले भरणे शक्य नाही. त्यामुळे तीन महिन्यांचे वीज बिल सरसकट माफ करण्यात यावे. वीज माफीची जी काही रक्कम होईल ती रक्कम अनुदान म्हणून महावितरणला राज्य सरकारने द्यावी. कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थकीत वीज बिलांची वसुली करू नये, या मागण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी व चळवळीचे ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून बुलडाण्यात श्री. तुपकर यांच्या नेतृत्वात वीज बिलाची होळी करण्यात आली.

यावेळी राणा चंदन, पवन देशमुख, शे. रफिक शे. करीम, दत्तात्रय जेऊघाले, आकाश माळोदे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हाभर आंदोलने जिल्ह्यात हे आंदोलन तालुकास्तरांवर झाले. संग्रामपूरमध्ये विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात वीज बिलाची होळी करण्यात आली. इतर ठिकाणी तालुकाध्यक्षांनी नेतृत्व करीत आंदोलन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com