agriculture news in Marathi if have dare then demolish government Maharashtra | Agrowon

हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवाः उद्धव ठाकरे 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020

राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी नव्या तारखा दिल्या जात आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा.

मुंबई: राज्यातील आघाडी सरकार पाडण्यासाठी नेहमी नव्या तारखा दिल्या जात आहेत. तुमच्यात हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे सत्तेच्या ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाहीत, अशी टीका मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात संपन्न झाला. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपाचा भरपूर समाचार घेतला. 

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरचा हा पहिला दसरा मेळावा होता. कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे कुटुंबीय, भाजप नेते, राज्यपाल यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘सगळ्या राज्यात पाडापाडी कशासाठी करताय? पक्षावर लक्ष द्या, पण थोडे लक्ष देशावरही द्या. देश रसातळाला चालला आहे. देश कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही.

क्रांतिकारकांनी भाजपसाठी हा देश स्वतंत्र केलेला नाही. मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा पंतप्रधान मोदींचा अपमान आहे. संपूर्ण देशात फार विचित्र परिस्थिती सुरु आहे. आर्थिक घडी नीट बसण्याऐवजी ते इतरांचे सरकार पाडण्यात मग्न आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

ते पुढे म्हणाले, सत्तेत आल्यापासून आमच्यावर आरोप केले जात आहेत. खोटेनाटे आरोप करताना शिवसेना गप्प कशी? असे विचारले जाते. याचे उत्तर आज मी देतो असे म्हणत काही लोक गुळाच्या ढेपेला मुंगळे चिकटून बसतात, तसे बसून असतात. आम्ही तुमच्यासारखे ढेपेला चिकटणाऱ्या मुंगळ्यासारखे नाहीत. आमच्या वाटेला जाल तर मुंगळा कसा डसतो, हे दाखवू' असे सांगत 'हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा', असे आव्हानही ठाकरे यांनी भाजपाला दिले. 

महाराष्ट्राच्या एकजुटीला तडा जाईल, असे कोणतेही कृत्य आपण करता कामा नये. मराठा समाजासह इतर सर्व समाजांना मी न्याय देणारच, ज्याच्या-त्याच्या वाट्याचे सर्वांना मिळेल. पण, जातीपातीच्या कारस्थानांना बळी पडू नका. हिंदू म्हणजे काय हे तुमच्या सरसंघचालकांकडून शिकून घ्या. हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व म्हणणारी शिवसेना तुम्हाला नको आहे. मोहन भागवतांना राष्ट्रपती करण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्ववाद शिकवणारे संघमुक्त भारताची घोषणा करणाऱ्या नितीशकुमारांच्या गळ्यात गळे घालत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? 
महाराष्ट्रात गोवंश हत्या कायदा करता, मग गोव्यात गोवंश हत्येला बंदी का नाही? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी भाजपाला केला. राज्यात कोरोनासोबत इतरही संकटे आहेत. जीएसटीचा परतावा केंद्र सरकारकडून अजूनही देण्यात आलेला नाही. ३८ हजार कोटी केंद्र सरकारने दिलेले नाहीत. मग पैसे येणार कुठून? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला. 
 


इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये ‘स्वाभिमानी’चा रात्रभर...नाशिक  : दिल्लीत गेल्या सात दिवसांपासून...
सोलापूर जिल्ह्यातील ६५८...सोलापूर : जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ६५८...
कसमादेत बायोगॅस संयंत्र उभारण्यास पसंती देवळा, जि. नाशिक : मृत कोंबडी पक्षांची...
नांदेडमध्ये ‘पणन’कडून कापसाची २६ हजार...नांदेड : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
कृषी कायद्यांविरोधात जागरण आंदोलनपुणे ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी आणि पणन...
परभणीत केंद्र सरकारविरुद्ध निदर्शनेपरभणी : शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्याच्या...
निम्न दुधनाच्या दोन्ही कालव्यात पाणीपरतूर, जि. जालना ः ‘‘रब्बी हंगामातील...
औरंगाबादमध्ये `स्वाभिमानी’चे...औरंगाबाद : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा...
सोलापुरात ‘स्वाभिमानी’चा जागर सोलापूर : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी...
धुळे- नंदुरबार मतदारसंघात पटेलांपुढे...धुळे ः विधान परिषदेच्या धुळे- नंदुरबार...
आश्वासनानंतर शेतकरी संघटनेचे आंदोलन...पुणे ः राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये...
साताऱ्यात स्वाभिमानी संघटनेचे रात्रभर...सातारा : कृषी विधेयकाविरोधात पंजाब आणि हरियाना...
सिंचनासाठी ‘वान’वरून जलवाहिनी उभारावीतेल्हारा, जि. अकोला ः शासनाने अगोदर सिंचनासाठी...
वहितीदारांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी...नांदेड : ‘‘शेती करताना विविध कारणांनी शेतकऱ्यांचा...
बीड जिल्ह्यात अडीच लाखांवर शेतकरी...बीड ः महाविकास आघाडी सरकारच्या महत्वकांक्षी...
काँग्रेसने ५८ वर्षांनी भेदला भाजपचा गडनागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघात ५८ वर्षांनी...
लाडांच्या घरात ५८ वर्षांनंतर आमदारकीसांगली : तास धरून काम करणाऱ्या हाडाच्या...
जमिनीची सुपीकता जपण्यासाठी जैवविविधतेचे...परभणी ः मातीची पर्यायाने शेत जमिनीची सजीवता,...
आघाडीने चारली भाजपला धूळपुणे ः महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढलेल्या...
रत्नागिरीत जमिनीमध्ये नत्र, स्फुरदचे...रत्नागिरी ः जिल्ह्यातील जांभ्या जमिनीत नत्रासह...