Agriculture news in Marathi If the power goes out, tie the knot with us | Agrowon

वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समिती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

घरगुती ग्राहकांची वीज तोडल्यास आमच्याशी गाठ आहे, असा इशारा ‘आम्ही वीजबिल भरणार नाही कृती समिती’चे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिला. येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली.

कोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची मागणी प्रलंबित असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांचे हे विधान बेताल आहेत. घरगुती ग्राहकांची वीज तोडल्यास आमच्याशी गाठ आहे, असा इशारा ‘आम्ही वीजबिल भरणार नाही कृती समिती’चे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिला. येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली.

श्री. साळोखे म्हणाले, ‘‘लबाड ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. कोरोना काळातील वीजबिलात सवलत देऊ, असे त्यांनी सुरुवातीला म्हटले होते. त्यानंतर ग्राहकांना दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ म्हटले; मात्र गोड बातमी दिली नाहीच, त्यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिका बदलून थेट थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे वीज तोडायला येणाऱ्यांचे काय करायचे ते आम्ही बघतो.’’

कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, की शासकीय कार्यालयांची थकबाकी ५० लाखांवर आहे. त्यांची वसुली झालेली नाही आणि सर्वसामान्य जनतेवर कोरोना काळात आर्थिक संकट आले. अशा स्थितीत जेमतेम रक्कम थकीत असताना जोडणी तोडण्याचे आदेश देत असाल तर जनतेला वाली कोण, असा प्रश्‍न आहे.

बाबा पार्टे म्हणाले, की ऊर्जामंत्र्यांच्या अखत्यारितील वीज कंपनीतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भ्रष्टाचार पहिल्यांदा थांबवा, त्यानंतरच वीजजोडण्या तोडण्याची भाषा ऊर्जामंत्र्यांनी करावी. समितीचे सुभाष जाधव, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, किसन कल्याणकर, अनिल घाटगे, सुजित चव्हाण, दत्तात्रय जांभळे, विजयसिंह पाटील, विवेक कारंडे, महादेव पाटील आदींनी मनोगत व्यक्‍त केले.


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...
नगरमध्ये महावितरणच्या पायाभूत सुविधांचे...नगर : कृषिपंप वीज धोरण २०२०च्या अंमलबजावणीमुळे...