परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
वीज तोडल्यास गाठ आमच्याशी : कृती समिती
घरगुती ग्राहकांची वीज तोडल्यास आमच्याशी गाठ आहे, असा इशारा ‘आम्ही वीजबिल भरणार नाही कृती समिती’चे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिला. येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली.
कोल्हापूर ः कोरोना काळातील वीजबिले माफ करण्याची मागणी प्रलंबित असताना ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याचे आदेश दिले आहेत. ऊर्जामंत्र्यांचे हे विधान बेताल आहेत. घरगुती ग्राहकांची वीज तोडल्यास आमच्याशी गाठ आहे, असा इशारा ‘आम्ही वीजबिल भरणार नाही कृती समिती’चे निमंत्रक निवास साळोखे यांनी पत्रकार परिषदेत दिला. येथील विठ्ठल मंदिरात बैठक झाली.
श्री. साळोखे म्हणाले, ‘‘लबाड ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो. कोरोना काळातील वीजबिलात सवलत देऊ, असे त्यांनी सुरुवातीला म्हटले होते. त्यानंतर ग्राहकांना दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ म्हटले; मात्र गोड बातमी दिली नाहीच, त्यांनी दोन दिवसांपूर्वी भूमिका बदलून थेट थकबाकीदारांच्या जोडण्या तोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे वीज तोडायला येणाऱ्यांचे काय करायचे ते आम्ही बघतो.’’
कॉमन मॅन संघटनेचे ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, की शासकीय कार्यालयांची थकबाकी ५० लाखांवर आहे. त्यांची वसुली झालेली नाही आणि सर्वसामान्य जनतेवर कोरोना काळात आर्थिक संकट आले. अशा स्थितीत जेमतेम रक्कम थकीत असताना जोडणी तोडण्याचे आदेश देत असाल तर जनतेला वाली कोण, असा प्रश्न आहे.
बाबा पार्टे म्हणाले, की ऊर्जामंत्र्यांच्या अखत्यारितील वीज कंपनीतील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. भ्रष्टाचार पहिल्यांदा थांबवा, त्यानंतरच वीजजोडण्या तोडण्याची भाषा ऊर्जामंत्र्यांनी करावी. समितीचे सुभाष जाधव, जयकुमार शिंदे, अशोक भंडारे, किसन कल्याणकर, अनिल घाटगे, सुजित चव्हाण, दत्तात्रय जांभळे, विजयसिंह पाटील, विवेक कारंडे, महादेव पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले.
- 1 of 1064
- ››