Agriculture News in Marathi If power supply is not restored Jalasamadhi movement in Dhora river | Agrowon

वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा नदीत जलसमाधी आंदोलन 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 डिसेंबर 2021

महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा.

शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी खंडीत केलेला तालुक्यातील कृषी पंपाचा वीज पुरवठा त्वरीत सुरळीत करावा, अन्यथा जोहरापूर (ता. शेवगाव) येथे नेवासे रस्त्यावरील गोदावरी नदीत गुरुवारी (ता. ९) रोजी शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे नायब तहसिलदार रमेश काथवटे यांना निवेदनाद्वारे दिला. 

निवेदनात म्हटले आहे की, थकीत बिलाच्या वसुलीसाठी महावितरणने तालुक्यातील कृषी पंपाचा १५ दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत केला आहे. अतिवृष्टी व पुराच्या संकटातून बाहेर पडलेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरणने कोंडीत पकडले. राज्यातील इंदापूर, बारामती, नेवासे, कन्नडसह राज्यातील बहुतांशी तालुक्यात थकीत वीज बील न भरता वीजपुरवठा सुरळीत सुरू केला आहे. 

तालुक्यात या वर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर आता शेतकऱ्यांची रब्बी हंगामासाठी तयारी सुरू आहे. विहिरी व कुपनलिकांना मुबलक पाणी असताना महावितरणने वीज पुरवठा खंडीत केल्याने पिकांना पाणी देणे अशक्य झाले. त्यामुळे पाणी असूनही कांदा, गहू, हरभरा, तुरी व इतर बागायती पिके हातून जाण्याचा मार्गावर आहेत. अशा परिस्थितीत महावितरणने योग्य तोडगा काढून तालुक्यात इतर तालुक्यासारखा वीज पुरवठा सुरळीत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा, महावितरण व राज्य सरकारच्या विरोधात गुरुवारी (ता. ९) रोजी जोहरापूर (ता. शेवगाव) येथील ढोरानदीत स्वाभिमानी शेतकरी संघटना व महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करणार आहेत. याची जबाबदारी महावितरणची राहील, असे संघटनांच्या कार्यकत्यानी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

निवेदनावर किसान सभेचे संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, शहराध्यक्ष भाऊ बैरागी, दीपक ढाकणे, संजय लांडे, आदित्य लांडे, आजिनाथ उगलमुगले, गणेश लांडे, नितीन लांडे, विनायक नांगरे, संजय पांडव, अजिनाथ हरवणे, माऊली कराड, अजय कराड, संदिप बडधे, मनोज बडधे यांच्या सह्या आहेत.


इतर बातम्या
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...
‘अशोक’च्या निवडणुकीत ‘लोकसेवा’ची सत्ता...नगर ः श्रीरामपूर तालुक्यातील अशोक सहकारी साखर...
ग्रामपंचायतींना इंटरनेट सेवा त्वरित...सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना...
नगरमध्ये सहाशे शेतकऱ्यांना मिळणार... नगर ः शेतकऱ्यांना शेळीपालन, कुक्कुटपालन...
नांदेड जिल्ह्यात रब्बीत विक्रमी पेरणीनांदेड : पावसाळ्यात झालेल्या विक्रमी पावसामुळे...
शेतीमाल तारण योजनेत सात बाजार समित्याऔरंगाबाद : पणन मंडळाच्या औरंगाबाद विभागातील...
‘स्वाभिमानी’चे पीकविम्यासाठीचे ठिय्या...बुलडाणा : पीकविम्याच्या मुद्यावर चिखलीमध्ये...
उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा बँकेच्या संचालक...