agriculture news in Marathi, if problems not solve then agri officers on strike from 20 August, Maharashtra | Agrowon

कृषी सहायकांच्या अडचणी न सोडविल्यास २० ऑगस्टपासून आंदोलन

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक रखडलेली पदोन्नती प्रक्रिया व कृषी सहायकांच्या इतर अडचणींबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. मंगळवारी (ता. २०) काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल, तसेच ज्या कृषी सहायकांकडे पर्यवेक्षकपदाचा अतिरिक्त पदभार आहे तो सोडून देण्यात येईल. याबाबत अमरावती विभागीय सहसंचालकांना नुकतेच मागण्यांचे निवेदन संघटनेचे विभागीय सचिव उमेश वानखडे यांनी दिल्याची माहिती कोशाध्यक्ष अनंत देशमुख यांनी दिली.

अकोला ः अमरावती विभागातील कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षक रखडलेली पदोन्नती प्रक्रिया व कृषी सहायकांच्या इतर अडचणींबाबत तत्काळ कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कृषी सहायक संघटनेने दिला आहे. मंगळवारी (ता. २०) काळ्या फिती लावून कामकाज केले जाईल, तसेच ज्या कृषी सहायकांकडे पर्यवेक्षकपदाचा अतिरिक्त पदभार आहे तो सोडून देण्यात येईल. याबाबत अमरावती विभागीय सहसंचालकांना नुकतेच मागण्यांचे निवेदन संघटनेचे विभागीय सचिव उमेश वानखडे यांनी दिल्याची माहिती कोशाध्यक्ष अनंत देशमुख यांनी दिली.

याबाबत संघटनेने म्हटले आहे की, अमरावती विभागात २०११ मध्ये कृषी सहायक ते कृषी पर्यवेक्षकपदावर पदोन्नत्या झाल्या. तेव्हापासून कृषी सहायक पदोन्नती एक दिवास्वप्न ठरली. सदरील पदोन्नती प्रक्रिया २०११ च्या अंतरिम ज्येष्ठता यादीच्या आधारे तदर्थ पदोन्नती देऊन करण्यात आली होती. ज्येष्ठता सूची ही २७ आॅक्टोबर २०१५ ला प्रमाणित करून अंतिम करण्यात आली. ही सूची प्रमाणित मानल्यास सन २०११ मध्ये देण्यात आलेल्या तदर्थ पदोन्नत्या या चुकीच्या पद्धतीने झाल्या, असे लक्षात येते.

२७ आॅक्टोबर २०१५ च्या ज्येष्ठता यादीच्या आधारे झालेली पदोन्नती प्रक्रिया नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून सुरळीत होणे गरजेचे होते. परंतु, आजपावेतो ही प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे अमरावती विभागातील कृषी सहायकांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. ही प्रक्रिया सुरळीत करण्याच्या हेतूने सन २०१८ मध्ये आपण चुकीच्या पद्धतीने पदोन्नती झालेल्या कृषी पर्यवेक्षकांना पदावनत करण्याचा प्रयत्न केला. 

संबंधित कृषी पर्यवेक्षक न्यायालयात गेले. २० जूनला हे प्रकरण सामंजस्याने निकाली काढण्याच्या हेतूने कृषी सहायक संघटना, कृषी पर्यवेक्षक संघटना व न्यायालयात गेलेल्यांची सभा घेतली. त्या वेळी प्रकरण न्यायालयातून मागे घेण्याचे आवाहनही केले. मात्र, हे प्रकरण प्रलंबित राहलेले आहे. दरम्यान, १७ जुलैला कृषी आयुक्तालयाने अमरावती विभागातील कृषी सहायकांना कृषी पर्यवेक्षकपदावर तत्काळ पदोन्नती देऊन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत कळविले. मात्र, या कार्यालयाकडून न्यायालयीन प्रकरणाचा संदर्भ देऊन प्रक्रियेबाबत टाळाटाळ केली जात आहे. तरी, रखडलेली ही प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

कृषी सहायकांच्या इतर मागण्या

  • सातव्या वेतन आयोगानुसार कृषी सहायकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळावा
  • पीककापणी प्रयोगाचे वाटप मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करावे
  • कृषी सहायकांच्या प्रतिनियुक्त्या रद्द कराव्यात पोकरा योजनेसाठी मुख्यालयातील रिक्त पदे भरावीत
  • कृषी विभागबाह्य कामे व नैसर्गिक आपत्तीच्या काळात महसूल यंत्रणेचा दबाव कमी करावा   

असे असेल आंदोलन

  • २० ऑगस्ट - काळ्या फिती लावून कामकाज, पर्यवेक्षकपदाचा पदभार सोडणे
  • २१ ऑगस्ट - कार्यालयांसमोर धरणे आंदोलन
  • २२ ऑगस्ट - कृषी सहसंचालकांच्या कार्यालयासमोर धरणे
  • २६ ऑगस्टपासून - सहसंचालक कार्यालयासमोर साखळी उपोषण, सर्व योजनांच्या आॅनलाइन कामावर बहिष्कार
     

इतर बातम्या
कर्जमुक्तीत रत्नागिरी जिल्ह्यातील २३४...रत्नागिरी ः महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
नगर जिल्ह्यात मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा...नगर  ः ऑनलाइन सात-बारा संगणकीकरणाच्या...
पुणे जिल्ह्यात कर्जमुक्ती योजनेच्या...पुणे  ः जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले...
नाशिक  : चांदोरी,सोंनाबे येथे...नाशिक  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थ्यांचा...नगर  ः  सायेब, मागच्या काळात...
सांगलीच्या ५९६ शेतकऱ्यांचा...सांगली ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
भंडारा जिल्ह्यात ३५ हजार शेतकरी...भंडारा ः राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त...
टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९ पंप सुरूसांगली  ः टेंभू उपसा सिंचन योजनेचे १९५०...
नगर, नाशिकच्या शेतकऱ्यांची ८८ कोटींवर...नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांतील पंधरा...
कृषी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा...पुणे  ः कृषी विभागाच्या वतीने चौथ्या वार्षिक...
कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; ६८...मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री...
उस्मानाबादेतील कर्जमुक्तीच्या याद्या...उस्मानाबाद : महात्मा जोतिराव फुले शेतकरी...
मराठवाड्यातील कोरड्या पडणाऱ्या...औरंगाबाद : मराठवाड्यात पुन्हा एकदा उन्हाच्या...
राज्यात उन्हाचा चटका कायम पुणे : राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत....
‘पीएम-किसान’ योजनेत शेतकऱ्यांना ५१ हजार...नवी दिल्ली: केंद्र सरकारने गेल्या वर्षी पंतप्रधान...
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांचा गदारोळ मुंबई: शेतकरी कर्जमाफीबाबत सरकारने एकही आश्वासन...
कृषी शिक्षणाचा खर्चही आता लाखाबाहेर पुणे : राज्यातील खासगी कृषी शिक्षण संस्थांच्या...
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...