ऊसतोडणी कामगारांचे दर दुप्पट न केल्यास आंदोलन

आमच्या संघटनेचा साखर संघाशी करार होऊन सात वर्षे झाली आहेत. मागण्यांबाबत ‘राष्ट्रवादी''चे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि साखर संघास भेटणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संप अटळ आहे. - गहिनीनाथ थोरे-पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन २४ ऑक्‍टोबर २०१५ ला पाच वर्षांसाठी साखर संघाशी करार झालेला आहे. कराराची अजून एक वर्ष मुदत बाकी आहे. काही ऊसतोड कामगार संघटनांनी संप पुकारला आहे. मात्र, आमची संघटना त्या संपात सहभागी होणार नाही. - प्रदीप भांगे, महासचिव, महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मजूर व मुकादम संघटना
ऊसतोडणी कामगारांचे दर दुप्पट न केल्यास आंदोलन
ऊसतोडणी कामगारांचे दर दुप्पट न केल्यास आंदोलन
माळीनगर, जि. सोलापूर : महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनने विविध मागण्यांसाठी यंदा संपाचे हत्यार उपसले आहे. मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा या संघटनेने दिला आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य ऊसतोड कामगार मजूर आणि मुकादम संघटनेने या संपात सहभागी होणार नसल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियन १९८६ मध्ये स्थापन झालेली संघटना आहे. राज्यातील १२ लाख ऊसतोडणी कामगार या संघटनेशी निगडित आहेत. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्याशी १५ ऑक्‍टोबर २०११ ला झालेल्या चर्चेतून या संघटनेचा साखर संघाशी करार झाला होता.
दरम्यान, यंदा राज्यात जवळपास ११ लाख हेक्‍टर क्षेत्रातील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. उसाचे वाढते क्षेत्र लक्षात घेता यंदाचा गाळप हंगाम एक ऑक्‍टोबरपासून सुरू होण्याचे संकेत आहेत. मात्र, ऊसतोडणी कामगारांचा संप झाल्यास गाळप हंगाम लांबण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे राज्यातील कारखान्यांपुढे पेच उभा राहण्याची चिन्हे आहेत. 
  ऊसतोडणी कामगारांच्या मागण्या
  •     ऊसतोडणी कामगारांच्या दरात आणि मुकादमांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ करावी.
  •     शासनाने जाहीर केलेली २०१४ -१५ची  २० टक्के दरवाढ मिळावी.
  •     पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील ऊसतोडणी कामगार सुरक्षा विमा योजनेची अंमलबजावणी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com